Search
Close this search box.

अर्जुनी मोरगाव शिक्षण विभागात लाचखोरी, एसीबी कडून तिघांवर कारवाई.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया, दि. 12 नोव्हेंबर : शिक्षण विभागात देखील लाच खोरी सुरू असल्याचे धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात घडला असून 15 हजार रुपयाची मागणी करणारे दोन शिक्षकांसह एक खाजगी इसम लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. आरोपी लोकसेवक 1) विलास गोपाळा नाकाडे, वय 56 प्रभारी मुख्याध्यापक ( प्रशिक ) विद्यालय, टोला /मांडोखाल ता. अर्जुनी मोरगाव, 2) अशोक पांडुरंग लंजे वय 54 सहाय्यक शिक्षक, प्रशिक विद्यालय, रा. बोदरा ता. अर्जुनी मोरगाव, 3) खाजगी ईसम ज्ञानेश्वर वामन नाकाडे वय 36 वर्ष रा. कोरंबी टोला, ता. अर्जुनी मोरगाव असे असून तक्रार दि. 14/10 रोजी करण्यात आली, तर पडताळणी दि.15/10 रोजी झाली असून सापळा कार्यवाही दि.15/10 व दि. 22/10 रोजी करण्यात आली असून गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज दि. 12 नोव्हेंबर रोजी ही माहिती पुरवली आहे. आरोपींनी लाच मागणी 15 हजार रुपयाची केली असून तडजोडी अंति लाच मागणी रू 15 हजार रुपये इतकीच होती, सदर घटना प्रशिक विद्यालय, टोला /मांडोखाल ता. अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया या ठिकाणी घडली.

तक्रारदार हे प्रशिक विद्यालय टोला /मांडोखाल ता. अर्जुनी मोरगाव येथून परिचर या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत, सातव्या वेतन आयोगाच्या तीन ( लाभांची ) हप्त्याची रक्कम प्राप्त करण्यासाठी ते शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक, वेतन व भत्त्याचे बील तयार करणारे शिक्षक व शाळेच्या कार्यकारीणी ने दिलेल्या कुलमुखत्यार पत्रानुसार शाळेची देखभाल करणारा खाजगी ईसम यांना भेटले असता त्यांनी पंधरा हजार रुपये लाच मागीतली.

तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी ला. प्र. वि. गोंदिया येथे तक्रार दिली.
लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी क्रमांक 1 व 3 यांनी तक्रारदाराकडे सातव्या वेतन आयोगाचे तीन लाभ मिळवून देण्याकरीता पंधरा हजार रुपये लाच रकमेची मागणी केली व आरोपी क्रमांक दोन यांनी सदर लाच रक्कम देण्यासाठी प्रोत्साहन दिले.
तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलास काळे पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि. गोंदिया यांच्या मार्गदर्शनात राजीव कर्मलवार पोलीस निरीक्षक, पो.नि. राजीव कर्मलवार, पो. नि. उमाकांत उगले स.फौ. करपे, पो. हवा. मंगेश काहालकर, ना.पो. शि. संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, म.ना.पो.शि. संगीता पटले , रोहिणी डांगे, चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली.

AGM News24
Author: AGM News24

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz Open / Ai Website / Ai Tool