AGM News24

Latest Online Breaking News

श्रद्धा हत्याकांडातील आफताबला फाशी द्या

तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

Agm news24-प्रतिनिधी/ देवरी

दिनांक :23-Nov-2023: महाराष्ट्राची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकर या तरुणीची आफताब पुनावाला या दिल्लीत राहणार्‍या युवकाने मे महिन्यात निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराची झालेली विटंबनाही माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेचा भाजपचे महिला आघाडी देवरी तर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत तहसीलदार देवरी यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिले.

भारत देशात बेटी बचाव बेटी पढाओ अभिमान राबविल्या जात असले तरी दुसरीकडे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत त्यामुळे जलद गतीने या प्रकरणाचा खटला कोर्टात चालविण्यात यावा आणि आरोपी आफताब अमिन पूनावाला या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी निवेदनात केलेली आहे.

यावेळी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, अंबिका बंजार सभापती पंचायत समिती देवरी, वैशाली पंधरे, प्रज्ञा सांगिडवार, कल्पना वालोदे, शामकला गावड, ममता, अंबादे, नुतन सयाम, कमल मेश्राम, पिंकी कटकवार, सिता रंगारी, कौशल्या कुंभरे, सुनिता गावळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!