AGM News24

Latest Online Breaking News

पाटेकुर्रा जवळ काळी पिवळी आणि ट्रक मध्ये भीषण अपघात

ट्रक, काळी पिवळी अपघातात तिघांचा मृत्यू तर सहा गंभीर जखमी

सडक अर्जुनी तालुक्यातील भुसारी टोला परिसरातील घटना

गोंदिया, सडक/अर्जुनी- दिनांक. १६ नोव्हेंबर २०२२ तालुक्यातील गोंदिया कोहमारा मार्गावरील भुसारीटोला जवळ ट्रक क्रमांक एम एच ४० वाय ८४८७ याने गोंदियाकडे जात असलेल्या काळी पिवळी ला जबरदस्त धडक दिली, धडक इतकी जबरदस्त होती की त्यात काळी पिवळीचा चकना चूर झाला असून त्यात एक जण घटनास्थळावर तर दोन जण रुग्णालयात नेत असताना मरण पावले तर इतर सहा प्रवासी गंभीर जखमी असून गोंदिया येथील विविध इस्पतळात उपचार सुरू आहेत

मृतांमध्ये श्यामसुंदर किसनलाल बंग वय ७८ राहणार सडक अर्जुनी, सुरज शंकर मुनीश्वर वय २४ राहणार काळीमाती/ कट्टीपार तालुका आमगाव, अंबिका गोकुळप्रसाद पांडे वय ५५ राहणार चिंरचाळी/ कोहळीटोला तहसील सडक अर्जुनी तर जखमी मध्ये प्रनुल सतीश राठोड वय १५ राहणार भुसारीटोला, साकीरअली अकबरअली ४८, सडक अर्जुनी, मनीषा पवनलाल चिकलोंढे २५ वनरक्षक सडक अर्जुनी, वनिता अनिल भेंडारकर २८ राहणार चिखली तर इतर दोन अनोळखी प्रवासी असून त्यांचे पुढील उपचार गोंदियातील विविध रुग्णालयात सुरू आहेत

सदर अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार सचिन वांगडे स्टाफसह घटनास्थळी रवाना झाले जखमींना तात्काळ उपचारासाठी गोंदिया येथे पाठवून मृतक शामसुंदर बंग यांचे प्रेत पुढील कारवाई करिता सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी संकेत देवडेकर यांनी भेट दिली.

याप्रकरणी पोलीस स्टेशन दुग्गीपार येथे फिर्यादी सौ. ललिता राजेंद्र कवरे राहणार पाटेकुर्रा यांच्या तक्रारीवरून आरोपी ट्रक क्रमांक एम एच 40 वाय 84 87 च्या चालकाच्या विरुद्ध अपराध क्रमांक २६७/२२ कलम 279 337 338 304 (अ) सह कलम 134 184 मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवडेकर देवरी हे करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!