AGM News24

Latest Online Breaking News

भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा जाहीर सत्कार

गोंदिया, दिनांक :14 नोव्हेंबर 2022 : भाजपा महिला मोर्चा प्रदेश च्या अध्यक्ष चित्रा वाघ या 15 नोव्हेंबर रोजी गोंदिया दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यादरम्यान त्या महिला मोर्चा तर्फे महिला समाज भवनात आयोजित महिला मेळाव्याला उपस्थित राहतील. यावेळी चित्रा वाघ यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम यांनी दिली आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष केशवभाऊ मानकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाला खासदार सुनील मेंढे, आमदार . डॉ. परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, माजी आमदार, जिल्हा परिषद सभापती, महिला मोर्चाचे वरिष्ठ पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला सदस्य उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम यांनी दिली आहे.https://twitter.com/ArvindMendhe6/status/1592096589543505921?s=19

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!