AGM News24

Latest Online Breaking News

राका येथील त्या नवजात अर्भकाचे संशयीत आरोपी निष्पन्न!

गोंदिया, सडक-अर्जुनी :- दि:-05 पोलीस स्टेशन डुग्गीपार अंतर्गत मौजा राका येथे जिल्हा परिषद शाळेतील शौचालयात अज्ञात व्यक्तीने एका नवजात अर्भकास बेवारस स्थितीत टाकून दील्याबाबत खबर मिळताच डुग्गीपार पोलीसांनी तात्काळ जिल्हा परिषद श्याळेत भेट देवून नवजात अर्भकास प्राथमिक आरोग्य केंद्र सौदड येथे प्राथमिक उपचार देवुन गंगाबाई रुग्णालय गोंदिया येथे पाठविले . सदर अर्भकास प्राधान्याने व पोलीसांचे तत्परतेने उपचार मिळाल्याने त्यांची स्थिती सध्या चांगली असल्याचे सांगन्यात आले आहे.

या प्रकरणात अज्ञात आरोपी विरुदध पोलीस पाटील श्री मुन्नालाल धनलाल पंचभाई यांचे तक्रारीवरुन डुग्गीपार पोलीस ठाणेला अपराध क्र. २४३ / २०२२ कलम ३१५, ३१७ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवुन ठाणेदार सचिन वांगडे यांनी घटनास्थळाचे परीसरात वेगवेगळे तपास पथके तयार करुन पाठविली. या पथकांना मिळालेल्या माहीतीच्या आधारावरुन यातील संशयीत आरोपी निष्पन्न झालेले असुन पुढील योग्य कायदेशिर कारवाई सुरु आहे.

सदरची कार्यवाही निखील पिंगळे पोलीस अधिक्षक गोंदिया, अशोक बनकर अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सचिन वांगडे पो.स्टे. डुग्गीपार, पोहवा आनंद दामले, पोना झुमन वाढई, पोशि सुनिल डहाके, मपोशि शालिनी सलामे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!