AGM News24

Latest Online Breaking News

Sand Mafia : वाळू माफियांचा जीव घेणा हल्ला; स्वसंरक्षणार्थ हवेत केला गोळीबार

वाळू माफियाने (Sand Mafia) केलेल्या हल्ल्यानंतर मोहाडी तहसीलदार यांनी स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केल्याची घटना मोहाडी तालुक्यातील रोहा या गावी घडली आहे.

भंडारा, दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ : वाळू माफियाने (Sand Mafia) केलेल्या हल्ल्यानंतर मोहाडी तहसीलदार यांनी स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केल्याची घटना मोहाडी तालुक्यातील रोहा या गावी घडली आहे. गोळीबार झाल्याची ही घटना जिल्ह्यात हवेसारखी पसरली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तहसीलदार यांच्या तक्रारीनंतर मोहाडी येथे गुन्हा दाखल झाला case registered complaint of Teshilder असून एका आरोपीला अटक करण्यात आले आहे.

जेसीबी द्वारे टिप्परमध्ये वाळू घालण्याचा काम सुरू :

मिळालेल्या माहितीनुसार मोहाडी तहसीलदार दिपक कारंडे यांना रोहा या गावी साठवलेली वाळू जेसीबी द्वारे टिप्परमध्ये भरून चोरी केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. तहसीलदार दिपक कारंडे यांनी त्यांच्या चमूसह रोहा येथे ई भेट दिली असता जेसीबी द्वारे टिप्परमध्ये वाळू घालण्याचा काम सुरू होता. तहसीलदार यांनी तो काम थांबवून आम्हाला शासकीय मदत करण्यास मदत करावी असा आव्हान जेसीबी चालकाला दिला. मात्र जेसीबी चालकाने त्यांच्यावर जेसीबी च्या पंज्या द्वारे हल्ला चढविला मात्र तहसीलदार यांनी स्वताचा बचाव केला, त्यानंतर जेसीबी चालकाने तिथून जेसीबी घेऊन पळ काढला.

गोळीबार होताच जेसीबी चालक घाबरून पळला : मोहाडी पोलिसांना दिल्यानंतर मोहाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धावत तहसीलदार यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पुन्हा थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जेसीबी चालकाने पुन्हा त्यांच्यावर जेसीबी च्या पंज्याने जीव घेणा हल्ला केला. दोनदा झालेल्या जीवघेणा हल्ल्यामुळे तहसीलदार यांनी स्वताच्या स्वसंरक्षणार्थ त्यांच्याकडे असलेली लायसन धारक बंदुकीने हवेत गोळीबार केला. गोळीबार होताच जेसीबी चालक घाबरून जेसीबी तिथेच सोडून पळून गेला. या संपूर्ण घटनेची माहिती तहसीलदार यांनी मोहाडी पोलिसांना दिल्यानंतर मोहाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जेसीबी आणि टिप्पर ताब्यात घेतले. या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्यासह घटनास्थळी जाऊन चौकशी केली.

जेसीबी चालकाला अटक करण्यात आली : मोहाडी तहसीलदार दिपक कारंडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जेसीबी, चालक, मालक, तसेच टिप्पर चालक आणि मालक यांच्याविरुद्ध कलम ३५३, ३७९ नुसार गुन्हा नोंद केला आहे. सध्या जेसीबी चालकाला अटक करण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यामधे दोषी आढळल्यास इतरही लोकांवर गुन्हा नोंद करून अटक केली जाईल असे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी यावेळी सांगितले. माझ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने शेवटी नाईलाजास्तव मला माझ्या संरक्षणार्थ हवेत गोळीबार करावा लागला आहे. या वाळू माफियांचे जेसीबी आणि टिप्पर जप्त केली. त्यांच्या विरुद्ध मोहाडी पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!