AGM News24

Latest Online Breaking News

रडण्याचा आवाज आला म्हणून बघितलं तर दिसलं मन हेलावून टाकणारं दृश्य!

प्रतिनिधी, उपसंपादक अरविंद मेंढे ✍️

  • नवजात अर्भक सापडल्याने उडाली खळबळ
  • सडक-अर्जुनी तालुक्यातील धक्कादायक घटना

सडक/अर्जुनी, दिनांक. १ नोव्हेंबर २०२२ : गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील राका येतील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मंगळवार सायंकाळी ७:३० च्या सुमारास नवजात अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे अर्भक पुरुष जातीचे असून १ नोव्हेंबर मंगळवारी त्याचा जन्म झाला आहे.

गावातील काही सुत्रांनी माहिती दिली आहे. सायंकाळी शाळेच्या परिसरात लहान बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने काही लोकांनी पाहणी केली असता रक्ताने माकलेले बाळ दिसले. असतात काही नागरिकांनी त्या नवजात बाळाला सौंदड येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलविले. अश्यात बाळाचे वजन २.५० किलो ग्राम असल्याचे सांगण्यात येते. नागरिकांनी स्थानिक पोलिसांना या बाबत माहिती दिली आहे. या घटने मुळे गावात विविध चर्चानां उधान आले आहे.

कसा उघड झाला धक्कादायक प्रकार

शाळेच्या बाजूला असलेल्या घरातील एका व्यक्तिला ७:३० च्या सुमारास शाळा परिसरात लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. त्याचवेळी शौचालयातच्या आजूबाजूला रक्त सांडलेले दिसले. ही गोष्ट त्याने परिसरातील सर्व नागरिकांना सांगितलं लगेचच सर्वानी शाळेत धाव घेतली आणि शोधाशोध सुरू केली. तेव्हा शौचालयात नवजात अर्भक दिसले.

परिसरातील एका युवकाने नवजात अर्भकाला बाहेर काढले आणि कपड्यात गुंडाळले. तसच या बाळाला शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलविले. पुढील उपचार डॉ. निखील लाडे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!