AGM News24

Latest Online Breaking News

सडक/अर्जुनी तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी “अनिल मुनिश्वर” यांची नियुक्ती

सडक-अर्जुनी, दिनांक-३१ ऑक्टोबर २०२२ : गोंदिया जिल्हा मराठी पत्रकार संघ (अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेसी संलग्नित) पत्रकार संघाची सडक-अर्जुनी तालुका अध्यक्ष पदाची निवड दिनांक. ३० ऑक्टोबर रोजी रविवारला करण्यात आली.

अ‍ॅड. विरेंद्र जयस्वाल गोंदिया जिल्हा सचिव यांच्या आदेशानुसार शंभूशरणसिंग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नवीन नियुक्तीची घोषणा करण्यात आली. यावेळी सर्वानुमते अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार व संपादक अनिल मुनिश्वर यांची निवड करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे पत्र ३० ऑक्टोंबर २०२२ ला दिले आहे तसेच अनिल मुनिश्वर यांना तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी गठीत करणे व सदस्यांची नियुक्त करण्याचे पूर्ण अधिकार दिले आहे, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

यावेळी गोंदिया जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शंभूशरणसिंग ठाकूर, नरेश अगळे, उपसंपादक अरविंद मेंढे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!