AGM News24

Latest Online Breaking News

खाडीपार शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहाने साजरा

सडक-अर्जुनी. दिनांक-16 : वाचनाशिवाय प्रगती अशक्य आहे बदलत्या काळात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवत असून विद्यार्थ्यांनी वाचनावर भर देण्याची गरज आहे मन लावून वाचन करणेच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन सहाय्यक शिक्षक अनिल नान्हे यांनी केले.

तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खाडीपार येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक के. एम.पटले, शिक्षक पी. जे. बडोले, अनिल नान्हे, एन. एन. पाटील, एन. सी. भोयर, सौ.ए. वाय. बेंदवार उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्या अर्पण करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थ्यांना डॉक्टर कलाम यांच्या प्रेरणादायी जीवन चरित्रावर मार्गदर्शन करून त्यांच्या देशाप्रती समर्पित विविध कार्याची माहिती देण्यात आली. तसेच हात धुण्याचे प्रात्यक्षिक बडोले व बेंदवार मॅडम यांनी केले, कार्यक्रमाचे संचालन सौ बेंद्वार, यांनी तर आभार प्रदर्शन अनिल नान्हे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!