AGM News24

Latest Online Breaking News

हत्तीच्या हल्ल्यात एक ठार

  • अर्जुनी-मोर तालुक्यातील तिडका जब्बार खेडा परिसरातील घटना
  • प्रधान संपादक – अनिल मुनिश्र्वर

गोंदिया. दिनांक :४ ऑक्टोबर २०२२: जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबाध वन परिक्षेत्रातील तिडका जंगलालगत शेत शिवारात हत्त्यांच्या हल्यामध्ये तिडका निवासी सुरेंद्र जेठू कळईबाग वय 55 या आदिवासी शेतकर्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर जवरू कोरेटी वय 45 हा आदिवासी शेतकरी जखमी झाला आहे.

अर्जुनी-मोर तालुक्यातील तिडका या आदिवासीबहुल गावातील परिसरामध्ये मागील 29 तारखेपासून हत्तींचे वास्तव्य आहे. आदिवासी च्या उपजीविकेचे साधन म्हणून शेतीचे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते . हत्तीच्या होणाऱ्या नुकसानीपासून आपल्या शेतीचे रक्षण व्हावे याकरिता तिडका वासियांनी वनविभागाची च्या सूचनेनुसार आपल्या शेतीचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण गावकरी एकत्र येवून त्यांनी काल रात्रीला हत्तीचा कळप पळवून लावण्यासाठी डफळी वाजे आणि मशाली पेटवून आपल्या शेतांचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. हत्तीचा कळप त्यामुळे जंगलाच्या दिशेने पळून गेला . सकाळी जंगलातील हत्तीमुळे आपल्या शेताचेचे नुकसान झाले तर नाही या दृष्टिकोनातून पंचवीस ते तीस आदिवासी शेतकरी शेत शिवार मध्ये गेले असता लोकांचा समूह पाहून आराम करत असलेल्या हत्त्यांनी अचानक गावकऱ्यांवर हल्ला केला.

सदर हल्ल्यामध्ये एक आदिवासी शेतकरी जाग्यावरच मृत पडला तर एक शेतकरी जखमी झाला. सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले व पोलिसांच्या मदतीने मृतदेह नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता घेऊन आले. जखमी व्यक्तीला सुद्धा नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आलेले आहे .सदर घटना ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घडली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला असून सदर हत्तीच्या कळपाचा तसेच वाघाचा व इतर हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त वन विभागाच्या वतीने करण्यात यावा अशी जोरदार मागणी आदिवासी शेतकऱ्यांनी केलेली आहे . सदर घटना घडत असताना वन विभागाचे काही कर्मचारी घटनास्थळावर उपस्थित होते मात्र वनविभागाचे कर्मचारी पडून आल्याचा आरोप या प्रसंगी गावकऱ्यांनी केलेला आहे. या पळून आलेल्या कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा गावकऱ्यांनी केलेली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!