AGM News24

Latest Online Breaking News

मुलांच्या हातात वाहन देणे पालकांना पडणार चांगलेच महागात

भंडारा, दिनांक 27: भंडारा शहरात अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात यावी असे आदेश मा.पोलीस अधीक्षक श्री.लोहित मतानी भंडारा व मा.अपर पोलीस अधीक्षक ,भंडारा यांचे आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.सुभाष बारसे ठाणेदार पो.स्टे भंडारा,, पोलीस उपनिरीक्षक भुषण कोळी वाहतूक नियंत्रण शाखा, भंडारा यांचे पथकाने शास्त्री चौक परिसरात धोकादायक रित्या वाहन चालविणे व अल्पवयीन वाहन चालक कार्यवाही मोहीम राबवित असता 1)मो.सा क्रं MH-36 U 0359 वाहन चालक नामे- तुषार राजु सेलोकर, वाहन मालक नामे- राजु हागरू सेलोकर 2))मो.सा क्रं MH-36 AJ 5523 वाहन चालक नामे – राजीव राजेश मेश्राम , वाहन मालक नामे- राजेश दसाराम मेश्राम 3))मो.सा क्रं MH-49 AA-4904 चालक नामे- मोनु संतोष पाठक , वाहन मालक नामे – संतोष फत्तुजी पाठक 4)मो.सा क्रं MH-36 AD 4456 चालक नामे – कल्की राजु वाघमारे, वाहन मालक नामे – राजु राकेश वाघमारे 5)मो.सा क्रं MH-36 AH 3448 चालक नामे – मयूर आदेश कनोजे , वाहन मालक नामे- प्रमोद अम्रत कुंभरे असे एकुण 05 दुचाकी वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुले व आपले ताब्यातील वाहन अल्पवयीन मुलांना चालविण्यास दिले करीता पो.स्टे भंडारा येथे कलम 184,199 (अ)(1) मोटार वाहन कायद्यान्वये 5 वाहन चालक व 5 वाहनांच्या मालकांवर गुन्हे नोंद करुन क.207 मोटार वाहन कायद्यान्वये सदर 5 दुचाकी पो.स्टे भंडारा येथे जप्त करण्यात आली आहे.

सदर कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक भुषण कोळी वाहतूक नियंत्रण शाखा, भंडारा व त्यांचे पथकातील पोलीस हवालदार निलेश ननीर, पोलीस हवालदार सुनिल गजभिये, पोलीस हवालदार मुकेश गायकवाड,पोलीस अंमलदार शिवाजी गीतेयांनी केली आहे.

  • पालकांना आवाहन –

धोकादायक रित्या वाहन चालवून कुणाच्याही जिवीतास धोका निर्माण करु नये.तसेच आपल्या ताब्यातील वाहन अल्पवयीन मुलांना चालविण्यास देवू नये अन्यथा वरीलप्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!