AGM News24

Latest Online Breaking News

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, पालकमंत्र्यांची यादी जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.

मुंबई-दिनांक 25 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. खरतर पालकमंत्र्यांची यादी कधी येईल? असा अनेकांकडून प्रश्न उपस्थित केला जात होता. पालकमंत्र्यांच्या यादीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. राज्य सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शिंदे गटाला पालकमंत्रीपदांच्या यादीत तरी जास्त जिल्हे मिळतील, अशी शिंदे गटाच्या आमदारांना आशा होती. पण देवेंद्र फडणवीस यांनाच तब्बल सहा जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आल्यांच चित्र आहे.

राज्य सरकारच्या पाहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळातील विस्तारात भाजपच्या वाटेला महत्त्वाची खाती आली होती. गृह आणि अर्थ खातं भाजपने घेतलं होतं. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ही खाती ठेवली होती. याशिवाय गृहनिर्माण, ऊर्जा, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास ही महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं हे महत्वाचं खात जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पालकमंत्र्यांच्या यादीतही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जास्त जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया

चंद्रकांत दादा पाटील- पुणे

विजयकुमार गावित- नंदुरबार

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड

गुलाबराव पाटील – बुलढाणा

दादा भुसे- नाशिक

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड

तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग

अब्दुल सत्तार- हिंगोली

दीपक केसरकर -मुंबई शहर, कोल्हापूर

अतुल सावे – जालना, बीड

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!