AGM News24

Latest Online Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस तुमसर शहर विकासाच्या मुद्यावर काम करणार – माजी आ. राजेंद्र जैन

तुमसर तुमसर येथील दुर्गा प्रसाद अतिथी गृह येथे तुमसर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची महत्त्वपूर्ण बैठक माजी आमदार राजेन्द्र जैन, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुधे, माजी खासदार मधुकर कुकडे, आमदार श्री राजुभाऊ कारेमोरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधन करतांना श्री राजेंद्र जैन म्हणाले की, जनतेला जी आश्वासन दिली ती प्रामाणिक पणे पाळणारा पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आहे. मा.श्री प्रफुल पटेल यांनी जी आश्वासन दिली ती पूर्ण केली. श्री पटेलजी सारखे खंबीर नेतृत्व आपल्याकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी जनते पर्यंत जाऊन पक्षाचे ध्येय धोरण पोहोचवावे एक तास राष्ट्रवादी साठी या संकल्पनेतून कार्यकर्त्यांनी पक्ष बळकट करावे तसेच प्रभाग निहाय्य बूथ कमेटी तयार करावे. पक्ष संघटन मजबूत असेल तरच आगामी निवडणुकीत निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस ला यश मिळेल.

आमदार श्री राजुभाऊ कारेमोरे म्हणाले की, आगामी काळात नगर परिषद ची निवडणूक होणार आहेत या निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व ताकदिने उतरणार आहे. यासाठी प्रभाग निहाय पक्ष संघटन बळकटीची जबाबदारी स्वीकारून प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. तसेच कार्यकर्त्यांनी प्रभागातील सर्व सामान्य जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा.

या सभेला सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, पूर्व खासदार मधुकर कुकडे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे, धनंजय दलाल, देवचंद ठाकरे, अभिषेक कारेमोरे, सीमा लांजेवार, निशिकांत पेठे, सरोज भुरे, योगेश सिंगनजुडे, राजेश देशमुख, सुनील थोटे, सलाम तुरक, विजया चोपकर, शालिनी पेठे, जयश्री गभणे, वंदना आकरे, शूशलता गजभिये, आरती चकोले, रंजना पोटभरे, नेहा मोटघरे, सुरेखा कारेमोरे, लीना देशभ्रतार, पूनम धूळवार, मीना गाढवे, कविता साखरवाडे, पंचफुला गभणे, शिंतु गभणे, वृन्दा वैद्य, सुशीला चिंधालोरे, दीक्षा चिंधालोरे, तिलक गजभिये, गुलराजमल कुंदनानी, अनिल साठवणे, प्रमोद लांजेवार, सुदीप ठाकूर, नितीन समरीत, देवेश वर्मा, राकेश गेडाम, नंदू कुंभलकर, सुधीर देशमुख, रोहित तलमले, चेतना राणे, अमित चौधरी, सुबोध नागदेवे, मनोज तलमले , निखिल कळंबे, वईद पठाण, अक्षय गणवीर, हरीश मोगरे, अभिजित रामटेके, अविनाश रामटेके, सोनू सिंगाडे, सनी सांडेकर, अन्वर शेख, सलीम पठाण, कलीम पठाण, अमन शेख, रेहान शेख, रेहान तुरक, सुधीर देशमुख, मनीष पडोळे, निलेश तलमले , धनराज थोटे, संतोष हेडाऊ सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!