AGM News24

Latest Online Breaking News

पक्ष संघटन बळकटी कडे पदाधिकारी व कार्यकर्यांनी प्राधान्याने लक्ष केंद्रित करावे – माजी आमदार राजेंद्र जैन

तुमसर : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची महत्त्वपूर्ण बैठक तुमसर येथील राजाराम लॉन तुमसर येथे माजी आमदार राजेन्द्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे, आमदार श्री राजुभाऊ कारेमोरे, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुधे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली.

याप्रसंगी माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या राष्ट्रीय सचिव पदी व माजी खासदार श्री मधुकर कुकडे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार श्री राजेंद्र जैन म्हणाले की, सर्व सामान्य जनतेला च्या समस्या मार्गी लावून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि क्षेत्राच्या सर्वांगीण विकास घडवून आणणे हे पक्षाचे ध्येय धोरण आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात शेती सिंचनाकरिता बावनथळी प्रकल्प व अन्य लघु प्रकल्पाच्या माध्यमातून या भागाचा विकास करणे हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य उद्देश आहे.

हा वारसा या क्षेत्रात खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वाखाली आमदार श्री राजुभाऊ कारेमोरे पुढे नेत आहेत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच पक्षाला गाव व बूथ स्तरावर बळ मिळत आहे तसेच पक्ष संघटन आणखी मजबूत करण्यासाठी या क्षेत्रात एक तास पक्षा करीत या संकल्पनेतून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.

यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेन्द्र जैन, माजी खासदार, मधुकर कुकडे, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुधे, आमदार श्री राजुभाऊ कारेमोरे, धनंजय भाऊ दलाल, विठ्ठल कहालकर, अभिषेक कारेमोरे, देवचंद ठाकरे, धनेंद्र तुरकर, रामदयाल पारधी, राजुभाऊ माटे, ठाकचंद मुंगूसमारे, विठ्ठल रहमतकर, राजु ढबाले, मनोज वासनिक, सुरेश रहांगडाले, सचिन बावनकर, जितू तुरकर, क्रीष्णा बनकर, उमेश तुरकर, डॉ अरुण गजभिये, रामदास बडवाईक, सरोज ताई भूरे, रेखाताई ठाकरे, सुषमाताई पारधी, दिपमाला भवसागर, गजानन लंजेवार, मदन भगत, सचिन बावनकर, मनोज शुरमुरर, रामदास बड़वाक, गोल्डी घडले, कामेश बोपचे, परसयंत रहांगडाले, खैमराज रहांगडाले, गौशाईजी भगत, देवा भगत, कृषि खोबरागड़े, भवानी रहांगडाले, राजन भगत, कादर अंसारी, दिलीप ढाबाले, सुखशयम येदे, विलास गौपाले, संकेत गजभिये, राहुल भावसागर, दुलित कपगाते, देवेंद्र सहारे, भोजवंता धुर्वे, हिराचंद पुसाम, मनोज झुरमुरे, आम्रपाली पटले, याशिन छवारे, मिनाक्षी शहारे, सुमीत गौपाले, रतीराम खुणे सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!