AGM News24

Latest Online Breaking News

घटेगाव येथे आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

सडक/अर्जुनी. दिनांक 22 : ग्राम घटेगाव येथे ३०५४ अंतर्गत पुलापासून ते राजेश कोसरकर यांचा घरा पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता तसेच २५१५ अंतर्गत भाऊराव कोसरकर यांचा घरा पासून ते अंगणवाडी पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता या विकास कामांचे भूमिपूजन आमदार श्री.मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते करणात आले.

याप्रसंगी जि प. सदस्य सौ. सुधाताई राहांगडाले, सरपंच शामराव वासनिक, सरपंच संघटनाचे अध्यक्ष डी. यु.राहांगडाले, उपसरपंच श्रीपद कवरे, रेखाताई कोसरकर, योगिताताई शेंडे, दुर्गा नेवारे, नामदेव शेंडे, प्रमोद लांजेवार, नामदेव शेंडे, शिवदयाल यावलकर, मारुती वाढई पुरुषोत्तम लादे, नरेश शेंडे, रामकृष्ण राऊत, ऋषी शेंडे, मुन्ना बोरकर,व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!