AGM News24

Latest Online Breaking News

आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते एक कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

  • विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास हे आपले ध्येय आहे.

अर्जुनी मोरगाव: आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते दिनांक १८/०९/२२ रविवार रोजी करण्यात आले. यामध्ये धाबेटेकडी/आदर्श, कालीमाटी, गोठणगाव, तुकुमनारायण, झाशिनगर, जांभळी/येलोडी, कान्होली, पाढरवणी/माल इत्यादी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना, २५१५, स्थानिक आमदार विकास निधी, अल्पसंख्याक विकास निधी,तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम, आवरर्भिंत, समाजमंदिर, सिमेंट काँक्रीट नाली, पेविंग ब्लॉक बांधकामाचा समावेश आहे.

आमदार आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रयत्नातून अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून ग्रामीण भागात विकासकामे केली जात आहेत. या निधीतून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळाली आहे. हा निधी जनतेच्या अत्यावश्यक कामांसाठी वापरण्यात आला आहे. हा निधी मूलभूत सुविधांवर भर देऊन हे काम पूर्ण करण्यासाठी वापरला जात आहे.

या भूमिपूजन सोहळ्यात जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर, प. स. सदस्य आम्रपालीताई डोंगरवार, प. स. सदस्य,नूतन सोनवाने, प. स. सदस्य नाजूक कुंभरे, माजी.जि.प.सदस्य रतीराम राणे,दीपक सोनवाने सरपंच धाबेटेकडी/आदर्श, अरविंद जांभुळकर, डॉ. मधोराव हातझाडे, दीनदयाल डोंगरवार, गीताताई चांदेवार सरपंच गोठणगाव, कांचनकुमार ऊके सरपंच सुकळी, सुजाताताई बुडगेवार सरपंच रामपुरी, आशाताई गदवार सरपंच झाशिनगर, किशोर गुरुनेले, कलिराम काटंगे, अमरचंद वाघमारे, संजय ईश्वर, हर्षाताई राऊत, अनवर शेख, शरीफ शेख, खलील सय्यद, दिलीप झिंगरे, गोवर्धन नंदेश्वर, वीरेंद्र कसारे, हिरालाल फुंडे, भीमराव नंदेश्वर,आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!