AGM News24

Latest Online Breaking News

सडक अर्जुनी येथे प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस “सेवा पंधरवडा” अंतर्गत उत्साहात साजरा

सडक-अर्जुनी. दि. १७ सप्टेंबर : भारताचे प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षा मार्फत “सेवा पंधरवडा” साजरा करण्यात येत असुन, त्या अंतर्गत भारतीय जनता पक्ष व भाजपा युवा मोर्चा सडक अर्जुनी तालुकाच्या वतीने माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यालय सडक अर्जुनी येथे “भव्य रक्तदान शिबीर” चे आयोजन करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या हस्ते भारत माता,पंडित दिनदयाल उपाध्यक्ष व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिरास सुरवात करण्यात आली.यावेळी केक कापुन प्रधानमंत्री यांना शुभेच्छा देण्यात आल्या.रक्तदान शिबिरात ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी ज्येष्ठ नेते श्री.लक्ष्मीकांत धानगाये,जिल्हा उपाध्यक्ष डाॅ.भुमेश्वर पटले,तालुका महामंत्री श्री.परमानंद बडोले,श्री.गिरधारी हत्तीमारे,श्री.शिशिर येळे,तालुका उपाध्यक्ष श्री.विश्वनाथ रंहागडाले,श्री.खेमराज भेंडारकर,जिल्हा सहसंयोजक श्री.गौरेश बावनकर,माजी जि.प.सदस्य श्री.मिलन राऊत,श्री.विवेक राऊत,जिल्हा महीला महामंत्री छायाताई चौव्हाण,महीला तालुकाध्यक्ष सौ.पद्माताई परतेकी,महीला महामंत्री अंजलीताई मुनिश्वर,महिला उपाध्यक्ष रंजनाताई भोई, तालुका सचिव शितलताई गौर,पंचायत समिती सभापती संगीताताई खोब्रागडे,उपसभापती श्री.शालीदर कापगते,जिल्हा परिषद सदस्य कु.कविताताई रंगारी,चंद्रकलाताई डोंगरवार,माजी जि.प.सदस्य रुपालीताई टेंभुर्णे,शिलाताई चौव्हाण,जिजाताई पातोडे ,प.स.सदस्य वर्षाताई शहारे,सपनाताई नाईक,श्री.प्रशांत झिंगरे,श्री.विनोद बारसागडे,श्री.सुभाष कोळमते,यांच्यासह भाजपा,भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते,रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन युवा मोर्चा महामंत्री डिलेश सोनटक्के यांनी केले,मान्यवरांचे स्वागत श्री.किशोर डोंगरवार,श्री.तुकाराम राणे यांनी केले तर यशस्वीतेसाठी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष श्री.विलास बागळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!