AGM News24

Latest Online Breaking News

धानोरी येथे मुसळधार पावसाने सात घरे जमीनदोस्त

सडक-अर्जुनी, दि. १५ : तालुक्यातील पांढरी जिल्हा परिषद क्षेत्र अतंर्गत धानोरी येथील सात घरे मुसळधार पावसाने जमीनदोस्त झाली.सदर घटना सोमवारी दि.१२ सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली असून यात मोठे नुकसान झाले आहे . सुदैवाने या घटनेत जिवितहानी झाली नाही.

तालुक्यात मागील काही दिवसांपासुन मोठ्या प्रमाणात पावसाची रीपरीप सुरू आहे.कधी मुसळधार तर, कधी तुरळक पाऊस पडत आहे.त्यामुळे मातीच्या घरांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसत आहे.त्यातच सोमवारी एकाच दिवशी धानोरी येथील सात घरे पूर्णतः पडली आहेत.या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. घरात ठेवलेले ४० पोती धानाचे नुकसान झाले आहे.४०पोती धान मातीमध्ये मिसळले असून धानाला अंकूर निघाले आहेत. तसेच घरात ठेवलेले सामान टि.व्ही. ,फ्रिज, अन्नधान्य व इतर सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. गिरीधारी नारनवरे वय ७०वर्ष, मोरेश्वर नारनवरे वय६५वर्ष,नेतराम नारनवरे वय६०वर्ष,चुन्नीकुमार नारनवरे वय५५वर्ष,रविंद्र नारनवरे वय३२वर्ष,अरूण नारनवरे वय५२वर्ष, मुरलीधर नारनवरे वय४१वर्ष अशी नुकसानग्रस्तांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच तलाढी मनोज डोये यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.व तसा अहवाल तहसिल कार्यालयात पाठविला आहे. नुकसान ग्रस्तांना ताबडतोब आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर घटनेची माहिती कोसमतोंडी पं.स. क्षेत्राच्या सदस्या निशा गिरीधर काशिवार यांना मिळताच घटनास्थळी जाऊन नुकसान ग्रस्त कुटुंबाचे घरी भेट दिली.व पडलेल्या घरांची पाहणी केली.

या घटनेसंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असून , नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.तसेच नुकसान भरपाई मिळावी याकरिता पं.स.स्तरावर पाठपुरावा करून नुकसान ग्रस्तांना शासनाने त्वरीत घरकुल द्यावे , यासाठी प्रयत्न करणार आहे. घरकुल यादीत नुकसान ग्रस्तांची नावे समाविष्ट करण्यात यावी यासाठी धानोरी येथील सरपंच यांना ग्रा.प.चा ठराव घेऊन पंचायत समिती कडे मागणी करावी, असे सांगितले आहे.तसेच नुकसान ग्रस्तांना शासनाकडून लवकरात लवकर मदत दिली जाईल, याकरिता पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

निशा गिरीधर काशिवार पं.स.सदस्या सडक अर्जुनी

या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान ग्रस्तांना ताबडतोब शासनाने आर्थिक मदत करावी.मुसळधार पावसाने सात घरे पूर्णतः पडली असून त्यांचे कुटुंब दुस-याचे घरी आसरा घेऊन राहत आहेत ‌. प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ड यादीत फक्त एका नुकसान ग्रस्तांचे नाव आहे .इतरांचे नाव नाही. या नुकसान ग्रस्तांना ताबडतोब घरकुल मंजूर व्हावे यासाठी ग्रा प.चा ठराव घेऊन पंचायत समितीला पाठणार आहे.

प्यारेलाल पारधी सरपंच धानोरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!