AGM News24

Latest Online Breaking News

किशोर शेंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोना एकल महिला भगिनीला आर्थिक मदत

सडक-अर्जुनी, दिनांक ४ ऑगस्ट २०२२ :श्रीरामनगर (सौंदड) निवासी सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रीय ओबीसी संघटना सडक-अर्जुनी तालुका अध्यक्ष किशोर भाऊ शेंडे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने फुटाळा सौंदड येथील कोरोना एकल महिला भगिनी सुनिता हेमराज ठाकरे या महिलेच्या घरी जाऊन आर्थिक मदत देऊन वाढदिवस साजरा केला .या प्रसंगी कोरोना एकल महिला पुनर्वसन समीती तालुका समन्वयक अनिल मेश्राम शिक्षक, सेवानिवृत्त कृषी अधिकारी एफ आर टी शहा, पत्रकार राजेश मुनिश्वर, सेवानिवृत्त बॅंक अधिकारी दिलीप राऊत, अभियंता राहुल कोरे पाटोले वनरक्षक सडक अर्जुनी अमोल मेंढे उपस्थित होते.

या प्रसंगी एकल महिला भगिनी सुनिता हेमराज ठाकरे यांच्याशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना हिंमत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!