AGM News24

Latest Online Breaking News

ज्याला यशस्वी व्हायचे असते, तो आपली पायवाट स्वतः बनवतो, तो खरे परिश्रम घेतो – अपर जिल्हाधिकारी राजेश खवले

  • यशाचे तीन कानमंत्र, हजारोच्या संख्येने उपस्थिती

देवरी, दि.०२/०९/२०२२ : युवा मराठी पत्रकार संघ तालुका देवरी संलग्न हेल्पीगं बाॅईज ग्रुप देवरी यांच्या संयुक्तरित्या ( दि.०१) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले साहेब यांनी ज्याला यशस्वी व्हायचे असते, तो आपली पायवाट स्वतः बनवतो! जो खरे परिश्रम घेतो. त्याचबरोबर विविध मार्गदर्शन घेऊन वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचा मार्ग अवलंबिणारे विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी होतात, असे प्रतिपादन यावेळी केले. देवरी येथील आफताब मंगल कार्यालय येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांसह शिक्षकांना सुद्धा मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची योग्य दिशा ठरवणे ठरविणाऱ्या अशा स्पर्धा परीक्षांच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल युवा मराठी पत्रकार संघ संलग्न हेल्पीगं बाॅईज ग्रुप यांचे कौतुक केले.

युवा मराठी पत्रकार संघ संलग्न हेल्पीगं बाॅईज ग्रुप देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरला विद्यार्थ्यांचे उस्फुर्त प्रतिसाद लाभले. या प्रसंगी कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शक अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, नुतन पाटील साहेब प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. या व्यासपीठावर तहसीलदार अनिल पवार, राज्य उत्पादन शुल्क विभाग निरिक्षक तुषार लबाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी ललीत कुकडे, सचिन धात्रक, बंडु चिडे, उपकार्यकारी अभियंता सरोज परिहार, कृषी अधिकारी घनश्याम तोडसाम, एडवोकेट सचिन बावरिया, प्रितमपालसिंग भाटिया, मिथुन बंग, व प्राचार्यगन उपस्थित होते.

यशाचे तीन कानमंत्र सांगून आपल्या जीवनात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये येणाऱ्या अडचणी कशी सोडवायला पाहिजे. स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमके काय, विविध विभागांतील स्पर्धा परीक्षेचे स्वरूप कसे असते, ज्याला यशस्वी व्हायचे असते, तो आपली पायवाट स्वतः बनवतो! जो खरे परिश्रम घेतो यावर सखोल मार्गदर्शन अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले. तर अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी विद्यार्थ्यांच्या अतिशय उत्साही खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांसोबत वेळोवेळी संवाद साधत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून अभ्यासाचे महत्त्व पटवून देत, अभ्यासाचे नियोजन यावर विशेष मार्गदर्शन केले.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये तालुक्यातील हजारोच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या पुस्तका देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे मनमोकळेपणांनी मार्गदर्शकांकडुव देत विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास वाढविले. या प्रसंगी उपस्थित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा मराठी पत्रकार संघाचे संघाचे अध्यक्ष मुकेश खरोले, सूत्रसंचालन निखिल बसोंड तर आभार प्रदर्शन सचिन भांडारकर यांनी केले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये युवा मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य तसेच हेल्पीगं बाॅईज ग्रुपचे पदाधिकारी व सर्व सदस्य गण यानीं मोलाची भूमिका पार पाडली असून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!