AGM News24

Latest Online Breaking News

ग्राम चिचटोला येथे आमदार मा. श्री. मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते रस्ता बांधकामांचे भूमिपूजन संपन्न

सडक/अर्जुनी: दिनांक. 2 सप्टेंबर 2022: तालुक्यातील ग्राम चिचटोला येथे २५१५ अंतर्गत १० लक्षाचे भास्कर कापगते यांचा घरा पासून ते टीकाराम गहाणे यांचा घरा पर्यंत सिमेंट काँक्रिट रोड या कामांचे भूमिपूजन दिनांक १ सप्टेंबर २०२२ रोजी आमदार मा. मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते करण्यात आले. यात प्रामुख्याने रस्ता बांधकामांची गती वाढून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांना दिल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. गंगाधरजी परशुरामकर, जि.प. सदस्य सौ.सुधाताई रहांगडाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉ .अविनाश काशिवार, पं.स.सदस्या निशाताई काशिवार, माजी जि.प.सदस्य रमेश चुऱ्हे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष डि.यू.राहांगडाले, चिचटोलाचे सरपंच सचिन येसनसुरे, उपसरपंच अनिता बांबोडे,मुनिश्वर कापगते , डॉ.दिलीप कापगते, सदाशिव कापगते,टिकाराम गहाणे,व सर्व ग्रा.प सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!