AGM News24

Latest Online Breaking News

पोळा तसेच गणेश उत्सव सणाला बीडीडीएस पथक बुलढाणाच्या श्वान- शेरा,जिमी तसेच तस्संम साधनांचा वापर करून केली घातपात तपासणी

प्रतिनिधी,बुलढाणा : आपल्या संस्कृतीत पोळा तसेच गणेश उत्सव हे विशेष आणि महत्त्वाचे सण आहेत. आपल्या संस्कृतीत हे सण उत्साहाने साजरे केले जातात.त्यामध्ये प्रत्येक गावातील सर्व लोक, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत मिरवणूकी काढल्या जातात लोक एकत्र येऊन. प्रत्येक गावात बैलपोळा तसेच गणेश उत्सव आनंदाने साजरा करतात हे पाहण्यासाठी गावातील सर्व मंडळी एकत्र येत असतात.

या सनांना होत असलेल्या गर्दीला पाहून कोणताही घातपात न होण्याकरिता मा.पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया बुलढाणा, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २५ऑगस्ट तसेच दिनांक ३१ ऑगस्ट रोजी शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, शेगाव बसस्टँड परिसर,खामगाव बसस्टँड परिसर त्याचप्रमाणे वरवट बकाल येथील 132 KV विद्युत सबस्टेशन आणि संग्रामपूर येथील बस स्टँड परिसर या सर्व ठिकाणची घातपात तपासणी पोलिसांच्या फौजफाट्यातील सर्वात महत्त्वाचा व आपत्कालीन परिस्थितीचा आधार असलेला विभाग म्हणजे बॉम्बशोधक आणि बाँब नाशक यांच्या बीडीडीएस बुलढाणा द्वारे हुकुमी एक्के समजल्या जाणारे श्वान आणि पथकाच्या इतर तस्संम साधनांचा वापर करून करण्यात आली आहे. त्यानंतर सदर पथक हे वरवट बकाल,संग्रामपूर वरून पुढील तपासणी करिता जळगाव जा.,नांदुरा कडे रवाना झाले आहे

यावेळी PSI मोबिन शेख, ,हेड कॉन्स्टेबल ठाकुर, हेड कॉन्स्टेबल वैष्णव, हेड कॉन्स्टेबल पंडित, सोइस्कर,डॉग हँडलर संतोष जमदाळे, व जिमी आणि शेरा हे नाव असलेले डॉग ह्या सर्व बीडीडीएस पथक बुलढाणा यांच्या मदतीने ह्या संपुर्ण तपासण्या घेण्यात आल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!