AGM News24

Latest Online Breaking News

सरपंच सदाशिव ढेंगे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

भंडारा : दिनांक 28 ऑगस्ट 2022 ला अंजनगाव सुर्जी अमरावती येथे, ग्रामपंचायत हरदोली चे सरपंच सदाशिव ढेंगे यांना 2022 चा आदर्श सरपंच पुरस्कार आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य आदर्श सरपंच पुरस्कार 2022 सोहळा अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार 2022 हा कार्यक्रम अमरावती जिल्ह्यामधील अंजनगाव सुर्जी या ठिकाणी घेण्यात आला

तसेच या कार्यक्रमांमध्ये आदर्श सरपंच पुरस्कार 2022 वितरण सोहळा सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार 2022 सोहळा आदर्श गाव पाटोद्याचे आदर्श पुरस्कार निर्मित विकासाचे महामेरू माननीय सरपंच भास्कर पेरे पाटील व दर्यापूर अंजनगाव सुर्जी चे माननीय आमदार बलवान जी वानखडे तसेच समाज सुधारक माननीय सत्यपाल महाराज यांचे शिष्य संदीपपाल महाराज, वरामपाल महाराज तसेच सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम दादा घोगरे सर्व सर्व मान्यवरांच्या उपस्थित आदर्श सरपंच पुरस्कार 2022 मोहाडी तालुका ग्राम हरदोली जिल्हा जिल्हा भंडारा येथील आदर्श सरपंच सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य कोशाध्यक्ष सदाशिव ढेंगे यांना, मोमेंट्स , पुस्पगुछ,सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!