AGM News24

Latest Online Breaking News

ग्राम ताडगाव येथे आमदार मा. श्री. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते रस्ता बांधकामांचे भूमिपूजन संपन्न

मोरगाव-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम ताडगाव येथे भारतरत्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत ११ लक्षाचे देवानंद नंदेश्वर यांचा घरा पासून ते बाळू डोंगरे यांचा घरा पर्यंत सिमेंट काँक्रिट रोड तसेच पंढरी बोरकर ते रमेश गजभिये यांचा घरा पर्यंत सिमेंट काँक्रिट रोड या कामांचे भूमिपूजन दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी आमदार मा. मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने रस्ता बांधकामांची गती वाढून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांना दिल्या.

याप्रसंगी जि.प. सदस्य सौ.पौर्णिमाताई ढेंगे, तालुका राकाँप अध्यक्ष श्री. लोकपाल गहाणे प.स.सदस्य नूतन सोनवाने, सरपंच दामोदर शहारे, आशाताई नाकाडे, सुधिर कापगते, जांगडे. देवानंद नंदेश्वर, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!