AGM News24

Latest Online Breaking News

विषय : सामाजिक शिर्षक : सावरालं ना..

विषय:- सामाजिक

शिर्षक:- सावरालं ना..

कसा बदलेल हा समाज सांगा ना

माणूसच माणसाला ओळखेना

माणूसकी हरवत चाललीय

आता तरी सावराल ना

स्वार्थी भाव असलेल्या जगात

निस्वार्थी भाव दिसू द्या

नामाणूसकीला जागृत करत

आता तरी सावरालं ना

भेद कशाला हा उच-निचतेचा

एकमेकांशी बांधिलकी जपा ना

उन्हात सावलीचा आधार होत

आता तरी सावरालं ना

कुदृष्टी दिसतेय जिथे-तिथे

यात सुधारणा होईल ना

सन्मान देण्या प्रत्येक नारीला

आता तरी सावरालं ना

गुंड प्रवृत्ती बळावत चाललीय

कोवळ्या हातून घडतोय गुन्हा

त्यात संस्काराचे धडे गिरविण्या

आता तरी सावरालं ना

भ्रष्टाचारी काळोख दाटलाय

सत्यता कुठेही दिसेना

सत्याची कास धरण्यास

आता तरी सावरालं ना

✍️✍️भारती किरनापुरे/बनकर, गोंदिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!