AGM News24

Latest Online Breaking News

सरांडी/बुज येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंच द्वारे रक्तदान शिबिर संपन्न

भंडारा : दिनांक 20 आगस्त 2022: प्राथमिक आरोग्य केंद्र सरांडी/बुज येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंच द्वारे रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले. त्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमास सरपंच सुनिताताई बावणे व उपसरपंच विलास भाऊ तिघरे, माधवजी प्रधान,नितीन जी ढोरे ,विनोद जी ढोरे सुभाष जी राऊत,निलेश भाऊ ठाकरे उपस्थित होते. राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंच चे जिल्हाध्यक्ष सतिश ठाकरे व जिल्हा उपाध्यक्ष भोजराज मिसार , राहुल भाऊ दिवठे जागेश्र्वर कांबळे,रुपेश नखाते,शेखर राऊत,छगन,राऊत,महेश दिवठे,जितु करकाळे,रक्तसेवा ग्रुप भंडारा चे अध्यक्ष योगेश भाऊ देशकर,रोहित भुर्ले.शुभम बेदरे.तोषित रणदिवे,विकास नखाते,अनिल घोरमोडे व अन्य पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात हे कार्यक्रम घेण्यात आले

रक्तपेढी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथुन बोलवण्यात आली होती त्यामध्ये एकुन 58 व्यक्तींनी रक्तदान केले. डॉक्टरचे असे म्हणणे आहे की जानेवारी पासून आतापर्यंत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात जिल्ह्यात पहिल्यांदा इतके रक्तदान करण्यात आले.

यावेळी प्रा.आरोग्य केंद्र भंडारा चे वैद्यकीय अधिकारी बनसोड सर, डाॅ.अहिर मैडम, भंडारा रक्तपेढीचे चे डाॅ गोटेफोटे सर,राहुल सर व इतर कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!