AGM News24

Latest Online Breaking News

राजस्थान मधील दलित विद्यार्थ्यांची हत्याप्रकरणी दोषीवर कारवाईची मागणी

  • बौद्ध समाज बांधवांचे तहसीलदारा मार्फत राष्ट्रपतींना निवेदन

सडक-अर्जुनी : राजस्थान मधील जालोर जिल्ह्यातील सायल भागातील सुराणा येथील सरस्वती विद्यालयातील इयत्ता तिसरी मध्ये शिकणारा विद्यार्थी इंद्रकुमार देवराम मेघवाल यांनी तहान लागल्याने ठेवलेल्या माठातील पाणी घेतले या प्रकरणी मुख्याध्यापकाकडून दलित समाजातील विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली या घटनेत सदर विद्यार्थ्यांचा मृत्यू सुद्धा झाला असून ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेचा सडक अर्जुनी तालुक्यातील बौद्ध समाज बांधवांच्या वतीने आज ता 19 ला निषेध नोंदवून या घटनेतील दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सडक अर्जुनी चे तहसीलदार किशोर बागडे यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले.

निवेदन देताना विदेश टेंभुर्णे, नगरसेवक असलेष अंबादे, प स सदस्या वर्षा शहारे, सामाजिक कार्यकर्ता मदन साखरे, प्रा. राजकुमार भगत, बिरला गणवीर, रंजीता मेश्राम, रूपचंद खोब्रागडे, राकेश शहारे, प्रमोद वैद्ये, रेवाराम मेश्राम, संदेश शहारे, दिग्रेश टेंभुर्णे, जगदीश शहारे, भोजराज रामटेके,, अजय शहारे, साहिल फुले, सावन शहारे,विनय फुले, बलवीर पंचभाई, संदेश शहारे,त्रिषरण शहारे,सुशील लाडे, राहुल गणवीर, मनोज रामटेके,पूनम खोब्रागडे,मनीषा शहारे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!