AGM News24

Latest Online Breaking News

गोंदियात रेल्वे गाडीला भीषण अपघात; ५० पेक्षा अधिक प्रवासी जखमी

  • दोन ट्रेन आल्या एकाच ट्रकवर

गोंदिया, दिनांक १७ अरविंद मेंढे AGM News 24

रायपुर कडून नागपूरच्या दिशेने जाणार्‍या “भगत की कोठी” या रेल्वे गाडीला गोंदिया शहराजवळ अपघात झाला. पुढे जात असलेल्या मालगाडीला “भगत की कोठी” या रेल्वे गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाला असून अपघातात ५० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.

मालगाडीला धडक दिल्यानंतर “भगत की कोठी” या रेल्वे गाडीचा एक डब्बा रुळाखाली घसरला. ही घटना आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास झाली आहे. रेल्वे गाडीने अचानक दिलेल्या धडकेनंतर प्रवाशी जखमी जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!