AGM News24

Latest Online Breaking News

अरुणनगर येथील फुटबॉल स्पर्धेत नरेंद्रपुर फुटबॉल संघ चंद्रपुर विजेता

गोंदिया, अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील अरुणनगर येथील ग्रीन गार्डन स्टेडियम येथे मागील दहा दिवसापासुन भव्य चषक फुटबॉल स्पर्धा सुरु होती.आज स्पर्धेचा अंतिम सामना नरेंद्रपुर फुटबॉल संघ चंद्रपुर विरुध्द सिटी फुटबॉल संघ नागपुर यांच्यात खेळवण्यात आला.यामध्ये नरेंद्रपुर फुटबॉल संघ चंद्रपुरने विजय मिळवून चषकावर आपले नाव कोरले.माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या हस्ते विजेत्या नरेंद्रपुर फुटबॉल संघाला पन्नास हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले.

तर,उपविजेता सिटी फुटबॉल नागपुर संघाला पंचवीस हजार रुपये व चषक,तृतीय क्रमांक अरुणनगर युवा स्पोर्टिग फुटबॉल संघाला दहा हजार रुपयाचे रोख व चषक बक्षिस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील मालिकावीरचा मान नरेंद्रपुर फुटबॉल संघाचा अभिषेक राॅय याला मिळाला असुन गौरविण्यात आले.

बेस्ट डिफेन्सचा मानकरी नरेंद्रपुरचा प्रदीप दास,बेस्ट फॉरवर्डचा मान नरेंद्रपुरचा रितेश राॅय तर सिटी संघाचा संदिप शाहु हा बेस्ट हाफचा मानकरी ठरला.या खेळाडूंना मान्यावरांच्या हस्ते रोख पारितोषिक देण्यात आले.

या बक्षिस वितरण प्रसंगी भाजप जिल्हा परिषद गटनेता श्री.लायकरामजी भेंडारकर,जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई देशमुख,पंचायत समिती सदस्य डाॅ.नाजुकजी कुंभरे,श्री.रघुनाथजी लांजेवार,श्री.प्रल्हाद वरठे,श्री.प्राणगोपाल दास श्री.प्रवीण बिश्वास,श्री.बाबुलाल बनिक,श्री.सुजितजी,श्री.बिकास बैघे यांच्यासह फुटबॉल संघाचे व्यवस्थापक खेळाडू यांच्यासह फुटबॉल क्रिडाप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!