AGM News24

Latest Online Breaking News

देवपायली पुरात अडकलेल्या शेतकऱ्यास कृषि सहाय्यक व तलाठी यांनी दिले जीवदान

सडक/अर्जुनी जि. गोंदिया :- दिनांक 15 ऑगस्ट 2022 :- तालुक्यातील ग्राम बाम्हणी अंतर्गत झासी नगर येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यास कृषि सहाय्यक व तलाठी यांनी दिले जीवदान .दिनांक 12 ऑगस्ट पासून सतत होत असलेल्या पावसा मुळे शेतकरी रामलाल मोडकु सलामे हे दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी कुटुंबातील सदस्य यांच्या सह शेतात असलेल्या घरी होते.

झाशी नगर नजीक असलेल्या नाल्याला अचानक पूर आल्या मुळे घरातून बाहेर निघू शकले नाहीत. हि बाब गावातील युवा शेतकरी महेंद्र चुटे हे दुध संकलन करण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास आली त्यांनी तत्काळ गावातील शेतकरी गटाच्या व्हाट्सअप ग्रुप वर सदर घटनेची माहिती प्रसारित केली. तात्काळ गटातील शेतकरी ,कृषि सहाय्यक ,तलाठी,ग्रामसेवक यांनी घटनास्थळी धाव घेतली , युवा शेतकरी गटाचे सदस्य यांना कुटूबातील 3 सदस्य यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. परंतु शेतकरी रामलाल मोडकु सलामे यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू असताना अचानक पाणी पातळी वाढल्यामुळे रामलाल मोडकु सलामे यांचे बचावकार्य थांबवले गेले.

तो पर्यंत कृषि सहाय्यक राजशेखर राणे व तलाठी राजू उपरीकर घटना स्थळी हजर झाले व त्यांनी क्षणाचा विलंब न करता प्रशासकीय सूत्र हलवले व तहसीलदार किशोर बागडे ठाणेदार सचिन वांगळे ,तलाठी कुरेसी , तलाठी नंदागवळी ग्रामसेवक महेंद्र पदा , कुष्णा ठलाल ,श्यामराव चुटे ,रोजगार सेवक विश्वनाथ तरोने , विलास वटी ग्रामपंचायत सदस्य ,विलास शिवणकर माजी उप सभापती पंचायत समिती हजर झाले व पुढील बचाव कार्य बाबत तत्काळ निर्णय घेऊन कृषि सहाय्यक राजशेखर राणे व तलाठी राजू उपरीकर यांच्या मार्गदर्शनात युवा शेतकर्यांच्या दोन चमू तयार करून दोरी च्या सहाय्याने पुन्हा बचाव कार्याला सुरुवात केली कृषि सहाय्यक राजशेखर राणे व तलाठी राजू उपरीकर यांच्या सह 10 ते 12 युवा शेतकरी पुराच्या पाण्यात उतरून शेतकर्या पर्यंत पोहचले 30 मिनिट नंतर शेतकरी रामलाल मोडकु सलामे यांना पुरातून बाहेर काढण्यात यश आले तहसीलदार किशोर बागडे ठाणेदार सचिन वांगळे यांनी कृषि सहाय्यक राजशेखर राणे व तलाठी राजू उपरीकर यांच्या कार्याचे कौतुक केले .तसेच शेतकरी रामलाल मोडकु सलामे यांनी प्रशासनाचे आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!