AGM News24

Latest Online Breaking News

सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवेचा लाभ मिळावा : लायकराम भेंडारकर

गोंदिया, बोंडगावदेवी: ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता शासनाच्या आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधितांनी द्यवी, गावागावात आरोग्य सेवा पोहचणे गरजेचे आहे. गावातील जनतेला जलदगतीने प्राथमिक उपचार मिळण्यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांनी तत्परता दाखवावी. प्राथमिक आरोग्य केंद्रात भेडसावणाऱ्या समस्या पूर्णता मार्गी लावून गरजूंना आरोग्य सेवा तत्परतेने मिळविण्यासाठी आपला कटाक्ष राहणार असल्याची जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांनी ग्वाही दिली.

जवळील ग्राम चान्ना (बाक्टी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जण आरोग्य समितीच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आल्यानंतर पहिल्या प्रथमच जण आरोग्य समिती गठीत करण्यासाठी बोंडगावदेवी प्रभागाचे जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.

त्यात समितीच्या अध्यक्षपदी भेंडारकर, उपाध्‍यक्षपदी जि. प.सदस्य रचना गहाणे यांची निवड करण्यात आली. सदस्यांमध्ये पंचायत समिती सदस्य संदिप कापगते, पुष्प दुरुगकर, कुंदा लोगडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय राऊत, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी, डॉ. कुंदन कुलसुंगे, मिलिंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजन बोरकर, चान्नाच्या सरपंच प्रतिभा बोरकर, सिलेझरीच्या सरपंच सुनीता ब्राह्मणकर, बाक्टीचे सरपंच भानुदास वळगाये, भिवखिडकीच्या सरपंच कविता गेडाम, अरततोंडीचे उपसरपंच लीलाधर मुनेश्वर, बोरटोलाचे उपसरपंच काशिनाथ कापसे, सामाजिक कार्यकर्ते पंडरी लोगडे, शालीकराम बोरकर, भोजराम ब्राह्मणकर, उमेश तवाडे, पाणीपुरवठा विभागाचे अंबुल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे हेमंत निमजे, आरोग्य सहायिका मंदा नंदेश्वर यांचा समावेश करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!