AGM News24

Latest Online Breaking News

मंडळ आयोग यात्रेच्या निमित्ताने जनजागृती अभियान

गोंदिया, सडक-अर्जुनी : ओबीसी, व्हीजेएनटी, एसबिसी जनजागृती अभियान विदर्भातील ७ जिल्ह्यात १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट पर्यंत राबविण्यात येत असून त्यानिमित्त मंडळ जनजागृती यात्रेचे आगमन सडक-अर्जुनी येथे होताच मंडळ जनजागृती यात्रेमध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. एवढेच नव्हे तर पुढील काळात ओबीसींच्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रात सोई-सुविधा उपलब्ध कशा होतील, यावर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

मंडळ यात्रेला प्रामुख्याने यशस्वी करण्यासाठी अशोक लंजे, दिनेश कोरे ओबीसी कृती समिती अध्यक्ष, पत्रकार अनिल मुनिश्र्वर, विनोद बारसागडे, पुष्पाताई खोटेले, जागेश्वर पटोले, तुकाराम येरणे, रमेश लांजेवार,एफ. आरटी. शहा, रोशन बडोले, नगरसेवक अंकीत भेंडारकर, प्रल्हाद कोरे, पत्रकार राजेश मुनिश्र्वर, शाहीद पटेल, किशोर शेंडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बावनकर, माधव तरोणे, अनिल बावनकर, भृंगराज परशुरामकर, आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक संदीप तिडके व शिक्षक काशिवार यांनी तर आभार रमेश लांजेवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!