AGM News24

Latest Online Breaking News

सौंदड येथे परमात्मा एक सेवक सभामंडपाचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते भुमिपूजन

गोंदिया, सडक-अर्जुनी : खासदार सुनिलजी मेंन्ढे यांच्या विकास निधीतून सौंदड येथे रू.०५ लक्ष किंमतीचे परमात्मा एक सेवक सभामंडपाचे माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.याप्रसंगी काम दर्जेदार होण्यासाठी नागरिकांनी देखील लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच गावकऱ्यांनी एकत्रित येऊन उस्फुर्त सहभाग नोंदविला तर सभामंडपाचे काम आणखी चांगले होऊ शकेल असे माजी मंत्री बडोले यांनी सांगीतले.

यावेळी पंचायत समितीचे उपसभापती शालिंदरजी कापगते,जिल्हा परिषद सदस्य सौ.निशाताई तोडासे,पं.स.सदस्य वर्षाताई शहारे,माजी उपसभापती राजेशजी कठाणे,युवा मोर्चा जिल्हा महामंत्री हर्ष मोदी,ओमकार टेंभुर्णे, सदुभाऊ विठ्ठले,पुरुषोत्तमजी निंबेकर,किशोरजी डोंगरवार, मनोहर चांदेवार,जयपाल गहाणे,सावल इरले,हरी भांडारकर,जयपाल क्षिरसागर, विलास चांदेवार,ओमकारजी इरले आदी मान्यवरांसह परमात्मा एक सेवक बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!