AGM News24

Latest Online Breaking News

कोसमतोंडी येथील बायपास टि-पाईंट वरील विद्युत ट्रांन्सफाॅर्मर (डी.पी.) न हलविता अधिकारी दुर्घटनेच्या प्रतिक्षेत

गोंदिया, सडक-अर्जुनी: दिनांक: ३-८-२०२२ : तालुक्यातील कोसमतोडी गावालगत बायपास रोड तयार होऊन आज पाच वर्ष झाली आहेत.मुरदोली-कोसमतोंडी -एकोडी खमाटा रोडावर कोसमतोंडी येथील पेट्रोल पंप टि – पांईंट वर आजही उघडल्यावर रोडाचे मधोमध विद्युत ट्रांन्सफाॅर्मर (डी.पी.) लावलेली आहे.सदर विद्युत ट्रांन्सफाॅर्मर (डी.पी.) बायपास रोडाचे काम सुरू असतांनी इतरत्र हलवायला पाहिजे होती. पण तसे न करता सार्व.बांधकाम विभाग सडक अर्जुनी यांनी बायपास रोडाचे काम पूर्ण केले.मात्र विद्युत ट्रांन्सफाॅर्मर हलविले नाही.आजही सदर विद्युत ट्रांन्सफाॅर्मर ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी आहे.बायपास रोड हा नेहमी रहदारीचा मार्ग असून या मार्गावर राईस मिल असल्याने रोडावर नेहमी ट्रक उभे असतात.आणि याच रोडावर मधोमध विद्युत ट्रांन्सफाॅर्मर असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकारी एखादं मोठ्या दुर्घटनेच्या प्रतिक्षेत तर नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सार्व.बांधकाम विभाग सडक अर्जुनी यांनी सन २०१६-१७ मध्ये बायपास रोडाचे काम केले.परंतू विद्युत ट्रांन्सफाॅर्मर न हटविता विद्युत ट्रांन्सफाॅर्मर च्या चारही बाजूने डांबरीकरण करून टाकले. वास्तविक रोड बनविण्या आधी विद्युत ट्रांन्सफाॅर्मर व लावलेले इलेक्ट्रिक खांब हटविण्याकरिता सार्व.बांधकाम विभाग रोगाचे टेंडर काढतांनी रोडावर येणारे विद्युत तार व खांब यावर येणारा खर्च ३ ते ४ लाख रुपये टेंडर मध्ये लावून येतो.परंतू सार्व.बांधकाम उपविभाग सडक अर्जुनी व कंत्राटदार यांनी लाखों रुपयांचा भ्रष्टाचार करून विद्युत ट्रांन्सफाॅर्मर न हटविता रोडाचे काम केले.या बायपास रोड टि-पांईंटवर थ्री फेस लाईन असून गावाच्या जवळील शेतामध्ये विजेचा पुरवठा करण्यासाठी विजेचे रोहित्र (ट्रांन्सफाॅर्मर) उभारण्यात आले आहेत.मात्र आजघडीला ट्रांन्सफाॅर्मर चे झाकण गायब असल्याने त्यातील विजेचा फ्यूज व तारा उघडल्यावर आहेत.

त्यामुळे नागरिकांचे जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मुरदोली-कोसमतोंडी खमाटा रोड भंडारा, गोंदिया जिल्ह्याला जोडणारा रोड असून कोसमतोंडी टि-पांईंट वरून ५०० मी.वर भंडारा जिल्ह्याची सिमा आहे.रात्री बेरात्री या टि-पांईंटवर एखाद चारचाकी अथवा जड वाहनांची धडक होऊन केव्हाही अपघात होऊ शकतो.त्यामुळे लोकांना सार्व. बांधकाम उपविभाग सडक अर्जुनी किंवा विद्युत विभाग सडक अर्जुनी हे एखादं मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत असल्याची चर्चा आहे. या बायपास रोडावरील विद्युत ट्रांन्सफाॅर्मर हलविण्याबाबत अनेकदा वृत्तपत्रात बातमी देण्यात आली.तसेच लोकप्रतिनिधींना याबाबत माहिती असूनही याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते असल्याचे बोलल्या जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!