AGM News24

Latest Online Breaking News

कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा – आ. मनोहर चंद्रिकापुरे

गोंदिया, अर्जुनी-मोरगाव : दिनांक. 16 जुलै 2022 : शेतकरी हा देशाचा केंद्रबिंदू मानून त्याची आर्थिक स्थिती मजबूत केली पाहिजे.शेतकऱ्यांना वेळेवर बँकेचे कर्ज मिळाले तर त्यांना सावकाराच्या चक्रव्यूहात अडकण्याची वेळ येणार नाही.तालुक्यातील राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट त्वरीत पूर्ण करावे असे निर्देश आ मनोहर चंद्रिकापुरे यांनी संबंधीत बँकाचे व्यवस्थापकांना दिले.

शुक्रवारी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी कर्जवाटप उद्दिष्ट पूर्ण करण्याकरीता आयोजित सभेत बोलत होते. सभेचे अध्यक्षस्थानी आ चंद्रिकापुरे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रभारी तालुका सहाय्यक निबंधक हर्षल काळीकर, कृ.उ.बा.स.चे मुख्य प्रशासक लोकपाल गहाणे,प्रशासक उद्धव मेहंदळे, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भोजराज रहिले, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, वैनगंगा क्षेत्रीय ग्रामीण बँक, बँक ऑफ बडोदा, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक शाखाचे व्यवस्थापक, पंचायत समिती कृषी विभागाचे प्रतिनिधी यावेळी हजर होते.

आ चंद्रिकापुरे यांनी प्रत्येक बँकेच्या कर्जवाटपाबद्दल आढावा घेतला. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे संबंधित शाखा व्यवस्थापकांना सांगितले. आपण स्वतः कर्ज वाटपासंबंधी गावागावात जाऊन शेतकऱ्यांना पीककर्जासाठी सहकार्य करावे.

सद्या पाऊस जोमात झाल्याने रोवणीला वेग आला आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत.त्यांना कर्ज देऊन आर्थिक सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे. शेतकऱ्यांना कर्ज द्यावे असे त्यांनी सांगितले.यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य ,आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे प्रतिनिधी, गटसचिव उपस्थित होते. आमदार, सहाय्यक निबंधक व सर्व बँकचे व्यवस्थापक यावेळी हजर असल्याने शेतकरी व संस्थाचे प्रतिनिधी विविध अडचणी समोर आल्या. आ चंद्रिकापुरे यांनी सर्व समस्यांचे तात्काळ निवारण करून पीक कर्ज वाटपांचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देश दिले.उपस्थितांचे आभार हर्षल काडीकर यांनी मानले. सभेच्या यशस्वीतेकरिता सहाय्यक निबंधक कार्यालयाचे बुरले, गौतम तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय सिंगनजुडे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!