AGM News24

Latest Online Breaking News

संघटना पुरस्कृत प्रगती पॅनल कडुन गोंदिया भंडारा वनकर्मचारी सहकारी पतसंस्थेकरीता नरेशकुमार पातोडे यांना उमेदवारी जाहीर

गोंदिया, सडक-अर्जुनी दिंनाक: 5 जुलै 2022 : भंडारा गोंदिया वनकर्मचारी पतसंस्था निवडणूक कार्यक्रम आगामी काळात पुर्ण होणार आहे. सदर निवडणूकीत महा. वनरक्षक वनपाल संघटना नागपुर शाखा-गोंदिया ची पुरस्कृत प्रगती पॅनल या नावाने उमेदवार देत आहे. त्या अनुषंगाने दि. 02/07/2022 ला सडक अर्जुनी, डोंगरगाव वन्यजीव, डोंगरगांव आगार या झोन करीता उमेदवारी जाहीर करण्याकरीता तंटामुक्त गाव समिती ग्रा. प. डव्वा येथे मा. शैलेन्द्रजी भदाने प्रदेश महासचिव यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती.

सदर सभेमध्ये नरेशकुमार पातोडे, पुरुषोत्तम पटले यांची नावे उमेदवार म्हणून झोन मधील वनकर्मचा-यांकडुन देण्यात आली होती. दोन्ही उमेदवार यांच्यात सहमती न झाल्याने गुप्त मतदान घेण्याचे ठरले. त्यामध्ये नरेशकुमार पातोडे यांची वनकर्मचा-यांकडुन बहुमताने निवड करण्यात आली.

अध्यक्षीय भाषणात भदाने यांनी पतसंस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी योग्य उमेदवार देण्यात यावे. तसेच कॅशलेस योजना, विमा, आनलाइन माहीती, कॅंटीन सुविधा, गृहकर्ज, वाहन कर्ज अशा अनेक प्रकारच्या योजना लागु करून कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण राबविण्यात येईल असे सांगितले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पातोडे यांनी चुकीच्या प्रचाराला बळी न पडता कर्मचाऱ्यांनी उमेदवारी जाहीर करण्याकरीता जो पाठिंबा दाखवीला तोच पांठीबा मतदान करतेवेळी मिळेल अशी भावना व्यक्त करून आभार मानले .

या सभेला युवराज ठवकर, फिरोज पठान, नरेंद्र वाढई, दिनद्याल मेश्राम, सुनिल वैद्य, सचिन कुकडे, बबिता डोरले, विवेक अवस्थी, जिया खान, प्रविन केळवतकर, कल्याणी खोब्रागडे, सुनिल खांडेकर, उध्दवजी गायकवाड, दिलीप माहुरे, वनरक्षक वनपाल वनकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन अमित शहारे व आभार संजय चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!