AGM News24

Latest Online Breaking News

पावसाचे संकेत देणा-या कावळ्याचे घरटे दुर्मिळ

गोंदिया, सडक-अर्जुनी, दिनांक:30 जुन 2022 : पशुपक्षी निसर्गात होणारे बदल लवकर टिपतात, त्यानुसार वर्तनही करतात.पुर्वी हवामानाचा अंदाज सांगणारी यंत्रणा नव्हती.त्यावेळेस पशुपक्ष्यांच्या विशिष्ट हालचालीवरून पावसाचा अंदाज बांधला जात होता. कावळ्याच्या घरट्यावरून पाऊस यंदा कशा स्वरुपाचे पडेल याचे संकेत मिळत होते.

आजही पुर्वी सांगत असलेले लोक कावळ्याचे घरटे झाडाच्या कोणत्या भागात बांधले यावरून पावसाचा अंदाज बांधीत होते.कावळ्याने झाडाच्या अगदी शेंड्यावर घरटी बांधल्याने कमी पावसाचे संकेत सांगत असत. पुरातन काळापासून ग्रामीण भागात कावळ्याला पावसाचे संकेत देणारा पक्षी समजत असत.पण दिवसेंदिवस कावळ्यांची संख्या कमी झाल्याने गावखेड्यात व शहरी भागात घरटी शोधावी लागतात.

पूर्वीच्या काळात हवामान खाते नसल्याने गावठी उपाय व अंदाजावर अवलंबून राहत असत.काळानुसार विज्ञानाने प्रगती केली असली तरी पावसाच्या संबंधात हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरतो.पण पक्षांचा (कावळ्याचा ) अंदाज खरा ठरतो.कावळ्यांचे घरटे बोर, जांभूळ, बाभूळ,सावळ यासारखे काटेरी झाडावर कावळ्याचे घरटे आढळल्यास कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते.तर आंबा,निंब, अर्जुन,करंज,चिंच यासारख्या झाडावर घरटी केल्यास चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात होती.

परंतू कावळ्यांची घरटी झाडाच्या शेंड्यावर असल्यास अल्प (कमी) पावसाचे संकेत समजले जात असे .पण आता कावळ्यांची घरटी दुर्मिळ झाले आहेत. शोधून सुद्धा कावळ्यांची घरटी दिसत नाही. एखादच घरटी दिसतात.असे सदर प्रतिनिधी जवळ कोसमतोंडी येथील गुराखी घुशीराम वाघाडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!