AGM News24

Latest Online Breaking News

गोंदिया जिल्ह्यातील मलकाझरी व तुंबडीमेंढा चे प्रकल्पग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत

Featured Video Play Icon

गोंदिया,अर्जुनी-मोरगाव,दिनांक :१८ जुन २०२२ : वारंवार वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊनही राष्ट्रीय उद्यान नवेगाव बांध, बोंडे अंतर्गत पुनर्वसित गाव मलकाझरी व तुंबडीमेंढा च्या प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाचा मोबदला पूर्ण न मिळाल्याने सोळा जूनला आपल्या शेतात जाऊन शेती करण्याच्या उद्देशाने विजयसिंह अरोरा, रमेश गोटे, पुनाराम सयाम, श्यामलाल कुमरे व इतर प्रकल्पग्रस्त मलकाझरी येथे शेकडोच्यां संख्येत लहान मुलाबाळानंसह पोहोचले.

त्याच वेळी राष्ट्रीय उद्यान नवेगाव बांध व बोंडे देवरी वन्यजीव विभाग चे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार व नरेंद्र सावंत आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर पोचून प्रकल्पग्रस्तांचे म्हंनणे ऐकून घेतले व त्यांच्या मागण्या वरिष्ठ पातळीवर 15 दिवसाच्या आत सभा लावून सोडविण्याकरिता पाठपुरावा करण्याचे आश्‍वासनानंतर प्रकल्पग्रस्त जागेवरून निघून गेले व मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा परत येण्याचा निर्धार उपस्थित प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केलाआहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!