AGM News24

Latest Online Breaking News

प्रिया निंबेकर 8 जूनला आकाशवाणीवर झळकणार

  • पळसगांव/राका शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा

गोंदिया,सडक-अर्जुनी,दिनांक. ५ जुन २०२२ : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने विद्याप्राधिकरण व प्रथम संस्थेतर्फे आयोजीत शाळा बाहेरची शाळा या आकाशवाणी वरील उपक्रमात जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगांव येथील विद्यार्थ्यांनी कु.प्रिया निबेंकर (वर्ग 7 वा) हिची निवड करण्यात आली असून तिची मूलाखत 309 व्या 8 जून रोजी आकाशवाणीवरील नागपूर केंद्रावरून केंद्रावरून प्रसारित होणार आहे.

शिक्षणात खंड पडू नये व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नवीन नवीन गोष्टींची माहिती व्हावी व शिक्षण प्रवाहीत राहण्यासाठी विभीय आयूक्त व प्रथम संस्थेद्वारे आकाशवाणीवर शाळा बाहेरची शाळा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आकाशवाणीव आयोजित होणाऱ्या 309 व्या शाळा बाहेरची शाळा भागात ‘गणराज्य पद्धती’ या विषयावर पळसगांव/राका शाळेची विद्यार्थीनी कु.प्रिया निंबेकर हिची आईसह मूलाखत घेण्यात आली.

यावेळी अतिशय रोखठोकपणे मूलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनीने देवून गोंदिया जिल्ह्याचे नांव महाराष्ट्र राज्याच्या पटलावर आणण्याचे काम कु.प्रिया निंबेकर हिने केले..यावेळी मूलाखत यशस्वी होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी मा.बागडे साहेब, प्रथम जिल्हा समन्वयक मा.अविनाश चतूरकर, केंद्रप्रमुख मा.लांडगे,विषयतज्ञ राऊत यांनी सहकार्य केले, कु.प्रिया निंबेकर हिने आपल्या निवडीसाठी विशेष प्रयत्न करून मार्गदर्शन केल्याबद्दल व मूलाखत यशस्वी केल्याबद्दल शाळेतील मूख्याध्यापक मा. एस.आर.फूंडे ,वर्गशिक्षक संदिप तिडके, पद्विधर शिक्षक मा.भाष्कर नागपुरे सर,नितीन अंबादे सर, सौ.एस.टी.कापगते मँडम यांचे आभार मानले

कु.प्रिया निबेंकर हिच्या किमगीरीबद्दल मूख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, उपमूख्यकार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, शिक्षणाधिकारी कादर शेख,सरपंच भारती लोथे,उपसरपंच सूनिल चांदेवार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भास्कर मानकर, उपाध्यक्ष धनराज येरपूडे यासह गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

“प्रथम संस्था व विभागीय आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर आकाशवाणीवरील शाळा बाहेरची शाळा या उपक्रमासाठी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी कु.प्रिया निंबेकर हीची निवड होणे ही माझ्या शाळेसाठी गौरवास्पद बाब आहे.”

श्री. सूरेश आर.फूंडेमूख्याध्यापक,जि.प.शाळा पळसगांव/राका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!