AGM News24

Latest Online Breaking News

अज्ञाताने लावली तेंदूपत्ता बोऱ्यां (बोधां)ना आग,तीन लाख 60 हजारांचे नुकसान

AGM News 24

सडक-अर्जुनी, दिनांक.३ जुन २०२२ : दरवर्षी उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम शासनातर्फे वन व्यवस्थापन समिती मार्फत केले जाते त्याच प्रमाणे याहीवर्षी तालुक्यातील बिर्री/सिंधीपार येथील तलावाजवळील शेतात वन व्यवस्थापन समिती ने तेंदूपत्ता संकलन करून बोऱ्यांमध्ये भरून ठेवला होता व एक-दोन दिवसात त्याची उचल होणार होती परंतु दोन जूनच्या दुपारच्या सुमारास अज्ञाताने लावलेल्या आगीत तेंदूपत्ता चे 36 बोरे(बोध) जळून भस्मसात झाले असून पोलिस व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर पंचनामा करून पुढील चौकशी सुरू आहे,

यात तीन लाख 60 हजाराची नुकसान झाले असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहे त्याची तक्रार वन विभाग सडक अर्जुनी तसेच पोलीस स्टेशन दुग्गीपार येथे समितीच्या लोकांनी केली असल्याची माहिती आहे यावेळी ठाणेदार संजय पांढरे व वनपाल युवराज ठवकर, वनरक्षक गणेश्वरी चौधरी यांनी घटनास्थळावर भेट दिली असून त्या अज्ञात इसमाचा शोध सुरू असून पुढील कारवाई सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!