AGM News24

Latest Online Breaking News

“नाम फाउंडेशन” तर्फे धानोरा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला 25 हजारांची आर्थिक मदत

अकोला, दिनांक. ३० मे २०२२ : बार्शीटाकळी तालुक्यातील धानोरा येथील शामराव काशीराम लामतुरे (42) या अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने सततची नापिकी व लोकडाऊन मधील रोजगार बंद झाल्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तसेच त्यांनी शेतीसाठी बँकेकडून व खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून शेतीत अपेक्षित यश मिळत नसल्यामुळे लागणारा खर्च व त्यातून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न यामुळे आलेला कर्जबाजारीपणा यामुळे हे कर्ज कसे फेडावे या चिंतेतूमुळे त्यांना आत्महत्या करण्याखेरीज उपाय उरला नव्हता या नैराश्यातून त्यानी आपली जीवनयात्रा संपविली.

त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, सोबत 4 व 9 वर्षांचे दोन मुले आहेत. त्यानिमित्ताने शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या व नटसम्राट नाना पाटेकर व आदर्श अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या “नाम फाउंडेशन” या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला सानुग्रह मदत म्हणून 25 हजार रुपयांचा धनादेश त्यांची विधवा पत्नी श्रीमती बाली लामतुरे यांना देण्यात आला. ही मदत नाम फाउंडेशन चे विदर्भ व खानदेश चे समन्वयक हरीश इथापे, जिल्हा मार्गदर्शक प्रा. मधु जाधव यांच्या मार्गदर्शनात व नाम फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक माणिक शेळके यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते दिलीप सावरकर, श्री गुरुदेव सेवांडळाचे तालुका सेवाधिकारी डॉ. अशोक रत्नपारखी, देविदास कावरे, राजेश मोहोळ, योगेश येवले यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.

आतापर्यंत नाम फाउंडेशनने विदर्भ व मराठवाडा या भागात आठ गावे दत्तक घेतली असून अनेक जिल्ह्यांमध्ये जलसंधारण, तलाव खोलीकरण, नद्यांमधील गाळ उपसणे अशी अनेक समाजोपयोगी कामे लोकसहभागातून केली आहे तर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांना सानुग्रह मदत म्हणून 25 हजार रुपये नाम फाउंडेशन च्या वतीने देण्यात येते अथवा या कुटुंबातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना शिलाई मशीन, शेळ्या व इतर रोजगाराचे साहित्य मदत म्हणून देण्यात येते. आतापर्यंत अकोला जिल्ह्यातील 45 शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले असून 149 कुटुंबांना 25 हजार रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!