AGM News24

Latest Online Breaking News

सौंदड रेल्वे स्थानकावरून पॅसेंजर व एक्स्प्रेस गाड्या सुरू करा – राष्ट्रवादी काँग्रेस द्वारे निवेदन

अरविंद मेंढे – उपसंपादक AGM News 24

सडक-अर्जुनी, दिनांक. २८ मे २०२२ : रेल्वेने कोरोनाच्या काळात थांबवलेल्या पेसेंजर व एक्स्प्रेस गाड्या तातडीने चालवाव्यात यासाठी सडक/अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने दिनांक २८/०५/२०२२ रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक द.पू मध्य रेल्वे, नागपूर, यांना निवेदन देण्यात आले.

कोरोना विषाणूमुळे गेल्या 2 वर्षांपासून रेल्वे मंत्रालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व गाड्या रेल्वे मंत्रालयाने थांबवले, मात्र लसीकरणानंतर कोविड 19 चा संसर्ग कमी होऊनही ट्रेन सुरू होत नसल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे शाळा,महाविद्यालयीन मुलांना खूप त्रास होत आहे. यासोबतच रेल्वे बंद असल्याने सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांचीही गैरसोय होत आहे. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी बंद असलेल्या गोंदिया – बल्लारशा, चंदाफोर्ट ते गोंदिया, गोंदिया वडसा, बिलासपूर ते चेन्नई, कोरबा ते यशवंतपुर या गाड्या लवकरात लवकर सुरू कराव्यात आणि अर्जुनी मोरगाव रेल्वे स्थानक आणि सौंदड रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या एक्सप्रेस गाडीला थांबविण्यात यावेत व बंद गाड्या पुन्हा सुरू करण्यात यावेत. अशी मागणी स्टेशन मास्टर सौंदड श्री. चांदणखेडे मार्फत विभागीय रेल्वे व्यवस्थापक द.पू मध्य रेल्वे, नागपूर, यांना करण्यात आली.

यावेळी तालुका राकाँपा अध्यक्ष, डॉ.अविनाश काशिवार , नगर पंचायत सडक अर्जुनी अध्यक्ष तेजराम मडावी, नगर पंचायत सडक अर्जुनी उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, महिला तालुका राकाँपा अध्यक्ष, रजनी गिऱ्हेपुंजे, प.स. सदस्य शिवाजी गहाने, नगरसेविका शशी टेभूर्णे, नगरसेविका शाहिस्ता शेख, नगरसेवक आनंद अग्रवाल, माजी . प. स सदस्य मंजू डोंगरवार, दिलीप गभने, सचिन लोहिया उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!