AGM News24

Latest Online Breaking News

गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीचे जिल्हा अध्यक्षपदी डॉ. योगेंद्र भगत यांची नियुक्ती

गोंदिया, दिनांक. २७ मे २०२२ : गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीचे अध्यक्षपदी आमदार श्री. मनोहर चंद्रिकापुरे हे कार्यरत होते आमदार झाल्याने, कामाचा व्याप वाढल्याने त्यांचे जागी मा. खासदार श्री. प्रफुल्ल पटेल यांच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष श्री. जयंत पाटील यांच्या सहमतीने तिरोडा येथील गोंदिया जिल्हा परिषदेचे माझी सभापती व प्रगतशील शेतकरी डॉ. योगेंद्र भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच राष्ट्रवादी किसान आघाडीचे महासचिव एफ आर टी शहा यांनी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पक्षाचा राजीनामा दिल्याने त्यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारून त्या ठिकाणी मा. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या सहमतीने आदर्श गाव चिचटोला चे प्रणेते व प्रगतशील शेतकरी श्री मुनिश्र्वर यादवराव कापगते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे श्रेय डॉ योगेंद्र भगत व श्री मुनिश्र्वर कापगते यांनी मा. खासदार श्री प्रफुल पटेलजी व अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस चे महासचिव व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांना दिले आहे.

त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किसान आघाडीचे जिल्हा अध्यक्ष पदी व महासचिव पदी निवड झाल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, यशवंत गणवीर, डॉ अविनाश काशिवार, प्रेमकुमार रहांगडाले, सुरेश हर्षे, सि. के बिसेन, पुजा अखिलेशसेठ, सुधा राहंगडाले, लोकपाल गहाणे, केवल बघेले, कमलबापू बहेकार, गोपाल तीराले, कुंदन कटारे, बाळकृष्ण पटले, केतन तुरकर, किशोर तरोणे, डी. यु रहांगडाले, योगेश नाकाडे, राजलक्ष्मी तुरकर, मनोज डोंगरे, गणेश बरडे, डॉ अविनाश जयस्वाल, प्रभाकर दोनोडे, शिवाजी गहाणे, डॉ रुकीराम वाढई सहीत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!