AGM News24

Latest Online Breaking News

३ जून ची चाहूल..अन् पंकजाताई मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

Featured Video Play Icon
  • साहेबांचा २६ मे ते ३ जूनचा आपल्या अपेक्षांचा प्रवास अनुभव करू- पंकजा मुंडें

परळी ।दिनांक २६। लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा स्मृतिदिन येत्या ३ जून रोजी आहे. हा दिवसच मुळात सर्व सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांसाठी अत्यंत वेदनादायी असतो, एकही दिवस त्यांच्या आठवणीशिवाय जात नाही. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज फेसबुक पोस्ट करत “गोपीनाथ गडाचं” प्रोफाईल ठेवण्याचं आवाहन करत साहेबांचा २६ मे ते ३ जून चा आपल्या अपेक्षांचा प्रवास अनुभव करू असं म्हटलं आहे.

मुंडे साहेबांचं समाधीस्थळ असलेल्या “गोपीनाथ गडाचं” प्रोफाईल चित्र पोस्ट करत पंकजाताई मुंडे यांनी त्या चित्राच्या खाली ” संघर्ष की बडी-बडी व्याखाएं कर रहे थे सभी । मैंने पिता लिखकर सब को मौन कर दिया..। अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, २६ मे… संघर्ष आपल्या सर्वांचा.. आणि आपला विश्वास शपथ घेत होता मोदींजींच्या मंत्रिमंडळात.

३ जून पर्यंत हे प्रोफाईल ठेवू आणि साहेबांचा २६ मे ते ३ जून चा आपल्या अपेक्षांचा प्रवास अनुभव करू..३ जून ला गोपीनाथ गडावर सर्व हाच प्रोफाईल लावुन या असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!