AGM News24

Latest Online Breaking News

शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या लोकांनी मोर्चे काढणे हे शेतकऱ्यांसाठी लज्जास्पद

सडक-अर्जुनी, गोंदिया.दि. २५ मे: गोंदिया जिल्हा धानाचा जिल्हा आहे.जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिनांक २० मे रोजी रास्ता रोको आंदोलन केले. पण या आंदोलनात शेतकरी कमी आणि नेते व व्यापारी जास्त होते.ज्या सरकारने शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील केले त्यांनी शेतकऱ्यांचे मोर्चा काढणे हे हास्यास्पद आहे.अशी टीका माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे.

दरवर्षी १ ते ५ मे ला उन्हाळी धान खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू होते.उन्हाळी धान खरेदी करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.मागील भाजप सरकारच्या काळात दरवर्षी १ ते ५ मे ला धान खरेदी केंद्र सुरू होत होती परंतु या सरकारने आतापर्यंत धान्य खरेदी सुरू केले नाहीत.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.

या सरकारने शेतकऱ्यांना २०२१-२२ मध्ये बोनस दिला नाही.नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५०००० प्रोत्साहन अनुदान घोषित केले परंतु एकही शेतकऱ्याला भुगतान केले नाही.केंद्र सरकारने किसान सन्मान निधी अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले.परंतु राज्यातील सरकारने शेतकऱ्यांना काही दिले असा प्रश्‍न उपस्थित होते आहे.

खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांची धान खरेदी या सरकारने केली नाही आणि त्यांना एकही नुकसान भरपाई दिली नाही. फक्त विजेचे वाढीव बिल देऊन आणि लोडशेडिंग व लाईन कापून शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम या सरकारने केले. त्यामुळे शेतकरी नेत्याच्या आंदोलनावर विश्वास ठेवत नाहीत.

एकीकडे राष्ट्रवादीचे नेते राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल हे धान खरेदीचा लक्षांक वाढवावा याकरिता अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र व्यवहार करतात. त्यांचे पक्षाचे जिल्ह्यातील नेते व्यापारांना हाताशी धरून केंद्र सरकारला धान खरेदीबाबत जबाबदार धरून आंदोलन करतात.अशा प्रकारच्या कृत्यांच्या माध्यमातून शेतकरी विरोधी असल्याचा व राज्य सरकारला धोरण ठरविण्याचे अधिकार असतानी सुद्धा शेतकऱ्यांना भुलथाप देण्याचा षडयंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत असल्याची जहरी टीका माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!