AGM News24

Latest Online Breaking News

परिवर्तनाची शक्ती फक्त युवकांमध्येच – आमदार मनोहर चंद्रिकापुरे

सडक-अर्जुनी, गोंदिया : दोन वर्षे कोरोना महामारीच्या काळात गेले असतांना देशाला सावरण्याची गरज आहे मात्र देशात हिंदू – मुस्लिम वाद , मशिदीवरील भोंगे किंवा हनुमान चालिसा यापेक्षा चांगल्या शिक्षणाची, युवकांना रोजगाराची आवश्यकता असतांना अनेक लोक लोकांची दिशाभुल करण्याची कार्य करीत आहेत त्यामुळे देशात आज घडीला जी परिस्थिती आहे ती बदलण्याची शक्ती फक्त युवकांमध्येच आहे , असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने एरिया -५१ कोहमारा येथे आयोजित युवकांच्या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करतांना केले . स्वतंत्र भारत देशातील आर्थिक गुलामी व तिचे निर्मुलन या विषयावर युवकांरीता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच उपस्थित युवकाच्या सोबत संवाद साधला. पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या विचारानुसार काम करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भरीव कार्य करण्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कार्यकर्तानी आपले प्राधान्य द्या. पक्षातील सर्व ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली युवकाना काम करवा संघटना वाढीस भर देण्यात यावे. राष्ट्रवादीचे नेते खासदार मा.प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांची मजबूत फळी तयार करण्यात भर असल्याचे सांगीतले . तसेच युवकांची दर ३ महिन्यात कार्यशाळा घेण्याचा माझा प्रयत्न आहे . सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कामाची दखल श्रेष्ठींनी घ्यावी यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारून त्यांना योग्य ती संधी देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे .पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार शेवटच्या घटका पर्यंत घेऊन जाण्याच्या उद्देशाने संवाद संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा . डॉ . सतिश ढोके , समाजकार्य महाविद्यालय , काटोल हे उपस्थित होते . कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अविनाश काशिवार , श्री . प्रकाश चंद्रिकापुरे , प्रमोद लांजेवार , सौ . मंजू चंद्रिकापुरे , सौ . रजनी गिऱ्हेपुंजे , सौ . दिक्षा भगत , सौ . शिशिकला टेंभुर्णे , सौ . बोपचे व इतर मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन महेंद्र चंद्रिकापुरे यांनी प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक राहुल यावलकर यांनी तर आभार प्रशांत बालसनवार यांनी मानले . कार्यक्रमाकरीता सडक / अर्जुनी तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!