AGM News24

Latest Online Breaking News

नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांचा साकोली तालुका सरपंच संघटनेकडून सत्कार व चर्चा बैठक आयोजन 

 साकोली,भंडारा, दिनांक २४/५/२०२२ : पंचायत समिती साकोली नवनिर्वाचित सभापती गणेश आदे व उपसभापती सरीता करंजेकर यांचा (२४.मे.) साकोली तालुका सरपंच संघटनेकडून जाहीर सत्कार करण्यात आला. येथे विविध विषयांवर बैठकीचेही आयोजन केले होते.      

सत्कार व चर्चाबैठक प्रसंगी मंचावर खंडविकास अधिकारी उमेश नंदागवळी, सरपंच संघटना अध्यक्ष पवनकुमार शेंडे, उपाध्यक्ष नयना चांदेवार हे हजर होते. यांकडून सत्कारमुर्ती नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा शाल श्रीफळ देत सत्कार केला. विविध विषयांवर या बैठकीत ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचा संपामुळे खोळंबलेली कामे, त्यांच्या मागण्यांवर चर्चा व तोडगा, ग्रामपंचायत स्तरांवर पथदिवेबाबद, गावागावांत १००% करभरणा केल्याशिवाय शासकीय योजनांचा लाभ कुणालाही घेता येणार नाही या सर्व विषयांवर खंडविकास अधिकारी व सरपंच संघटनेकडून उपस्थीत सरपंच मान्यवरांसोबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

या सत्कार समारोहात पत्रकार मनिषा काशिवार व आशिष चेडगे यांचाही साकोली तालुका सरपंच संघटनेकडून सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व साकोली तालुका येथील ग्रामपंचायतचे सरपंच हजर होते. कार्यक्रमात संचालन सरपंच संघटना उपाध्यक्ष नयना चांदेवार यांनी तर आभार सरपंच लिलाधर सोनवाने यांनी मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!