AGM News24

Latest Online Breaking News

सरपंच संघटनेकडून पत्रकार जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे व सचिव मनिषा काशिवार यांचा सत्कार

 साकोली, भंडारा, दिनांक.२४ मे२०२२ : साकोली तालुका सरपंच संघटनेकडून पंचायत समिती सभागृहात सरपंच चर्चाबैठक आयोजन प्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र जिल्हा भंडारा अध्यक्ष आशिष चेडगे व साकोली तालुका सचिव मनिषा काशिवार यांचा वेगवान बातम्यांप्रती व सोशल मिडीयावर जनबातमींवर जाहीर अभिनंदन व्यक्त करीत सत्कार करण्यात आला.      

 या सरपंच संघटना बैठक आयोजनात मंचावर खंडविकास अधिकारी उमेश नंदागवळी, सरपंच संघटना अध्यक्ष पवनकुमार शेंडे, उपाध्यक्ष नयना चांदेवार, सभापती गणेश आदे, उपसभापती सरीता करंजेकर हजर होते. बोलतांना सरपंच संघटनेचे अध्यक्ष पवनकुमार शेंडे यांनी सांगितले की, सोशल मिडीयावर सर्वात वेगवान व भ्रष्टाचाराला आळा घालता यावा यासाठी साकोली मिडीयावर नेहमीच बातमीमुळे खळबळजनक प्रभाव पडला तसेच पब्लिक ऐप मिडीयावर ताज्या घडामोडी सेकंदातच हजारांच्यावर प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याचे काम आज ईलेक्ट्रॉनिक मिडीयावर शक्य होते आहे.

सरपंच संघटनेकडून प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हाध्यक्ष व साकोली मिडीया एडीटर आशिष चेडगे व सकाळ पत्रकार तथा पत्रकार संघ तालुका सचिव मनिषा काशिवार यांचा सत्कार करताना तालुक्यातील सर्व सरपंच महोदय उपस्थित होते.

More Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!