AGM News24

Latest Online Breaking News

साकोली पत्रकार कार्यालयात बुद्धपौर्णिमा साजरी

  • प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे आयोजन

 साकोली : १६ मे – बुद्धपौर्णिमा निमित्त भंडारा जिल्हा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ साकोली येथील जिल्हा कार्यालयात बुद्धपौर्णिमा साजरी करण्यात आली. या प्रसंगी विशेष मान्यवर व पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.      बुद्धपौर्णिमा निमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा भंडारा कार्यालय – प्रेसमिडीया स्टूडियो गणेश चौक साकोलीत बुद्धपौर्णिमा साजरी करण्यात आली.

याप्रसंगी माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण केले. यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जिवनचरीत्रावर अनमोल मार्गदर्शन केले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे, शहर अध्यक्ष रूग्वेद येवले, तालुका सचिव मनिषा काशिवार, तालुका उपाध्यक्ष शेखर इसापुरे, तालुका सहसचिव चेतक हत्तीमारे, शहर सचिव प्रा. ताराचंद कापगते, शहर उपाध्यक्ष रवि भोंगाणे, शहर संपर्क प्रमुख मनोज गजघाट, सामाजिक कार्यकर्ते बलराज नंदेश्वर, गणेश सुर्यवंशी, राजू कापगते, विजय जैन, आदित्य चेडगे व अन्य हजर होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!