AGM News24

Latest Online Breaking News

केतकी चितळेला कठोर शिक्षा करा; राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन

सडक-अर्जुनी, गोंदिया.दि- १८ मे : देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांच्यावर कवितेच्या माध्यमातून सोशल मीडियाचा माध्यमातून टिका करणाऱ्या मनोरुग्ण केतकी चितळे ह्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व अश्या मनोवृत्तीला धडा शिकवन्यात यावे ह्या करिता सडक/अर्जुनी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज डूग्गीपार येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि गुन्हा दाखल व्हावा म्हणून निवेदन देण्यात आले.

निवेदन सादर करते वेळी सडक/अर्जुनी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्षा रजनीताई गिर्हेपुंजे, वंदनाताई डोंगरवार उपाध्यक्ष नगर पंचायत, जि.प.सदस्या सुधाताई रहांगडाले, कामिनीताई कोवे सभापती नगर पंचायत, शाहिस्ता शेख नगरसेविका,रीता लांजेवार नगरसेविका, पुष्पमालाताई बडोले सरपंच डव्वा, छायाताई टेकाम सरपंच रेंगेपार, शुभांगीताई वाढवे, अनिताताई बांबोर्ड उपसरपंच चीचटोला , रेखाताई कोसलकर मा सरपंच, गुणवंताताई कापगते मा सरपंच, तसेच अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!